कलाविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. प्रवेशाचे निकष http://www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Read More