Tuesday, September 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

शिक्षणासाठीच्या संघर्षाची संवेदनशील गोष्ट दाखवणारा “भाटा

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातही काही समाज घटक शिक्षणापासून वंचित आहेत. याच वंचित घटकापैकी एक असलेल्या बेलदार समाजातील एक संवेदनशील कहाणी आता मोठ्या पडद्यावर येत आहे. बेलदार समाजाचा इतिहास उलगडत शिक्षणासाठीच्या संघर्षाची गोष्ट भाटा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असून, उत्कृष्ट स्टारकास्ट असलेला हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

व्ही. डि. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने “भाटा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रिजवान शेख, मितेश पराडकर, सुनील सुनील कातकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची आहे, तर पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांचे आहेत. श्रेयस आंगणे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून संगीतही त्यांचेच आहे तर छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे. .सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेते अरुण नलावडे, प्रशांत मोहिते अभिनेत्री रुपाली जाधव, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण दावभट, ऋषभ जाधव, प्रेमा किरण बालकलाकार तनिष्का जाधव यांचा दमदार अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.

पारंपरिक समाजरचनेत प्रत्येक समाजघटकाच्या कामाचे स्वरुप निश्चित केलेले होते. मात्र, बदलत्या काळानुसार ही परिस्थिति बदलत गेली आणि नवी पिढी नवी स्वप्ने पाहू लागली. मात्र, अजूनही बेलदार समाजासारख्या घटकांतील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. याच समाजातील एक संवेदनशील गोष्ट भाटा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. पिढ्यानपिढ्या दगड फोडत जगणाऱ्या बेलदार समाजातील एक बाप आपल्या मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं स्वप्न पाहतो. गरिबी, परिस्थिती आणि समाजाच्या पारंपरिक विचारांविरोधात उभा राहून आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगलं भविष्य देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बापाची गोष्ट भाटा या चित्रपटात मांडण्यात आला आहे. शिक्षण, नव्या पिढीची स्वप्ने, प्रथा-परंपरा या माध्यमातून एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. त्याशिवाय बेलदार समाजाचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्नही या चित्रपटातून पहिल्यांदाच करण्यात आला आहे. चित्रपटाच्या उत्सुकता वाढवणाऱ्या टीजरनंतर आता चित्रपटाचा प्रभावी ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरला समाजमाध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची संकल्पना, ट्रेलरचं कौतुकही होत आहे. त्यामुळे या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading