Sunday, May 24, 2026

Business

BusinessLatest News

बेन कॅपिटलचे पाठबळ असलेल्या धूत ट्रान्समिशन लिमिटेडने 1,400 कोटी रुपये उभारण्यासाठी नवीन समभाग विक्रीद्वारे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर केला

  बेन कॅपिटलचा पाठिंबा असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या विद्युत तसेच इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक असलेल्या धूत ट्रान्समिशन लिमिटेडने, आपल्या आयपीओसाठी बाजार

Read More
BusinessLatest News

एअरबीएनबीवर आता होमस्टेव्यतिरिक्त कार रेंटल्स, किराणा मालाची घरपोच सेवा, विमानतळ पिकअप, आणि बरेच काही

  पुणे  : आम्ही मागील वर्षी ‘एअरबीएनबी एक्सपीरियन्सेस’ आणि ‘एअरबीएनबी सर्व्हिसेस’ सुरू करून एअरबीएनबीचा विस्तार घरांपलीकडे केला. त्याचा भाग म्हणून

Read More
BusinessLatest News

जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडकडून आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष २०२६ चे वित्तीय निकाल जाहीर

मुंबई : जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडने (“कंपनी”) आज ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे आपले एकत्रित आर्थिक निकाल

Read More
BusinessLatest News

स्टार हेल्थकडून जवळपास २० टक्‍के कमी प्रीमियमसह परवडणारा ‘व्हॅल्यू प्लस’ आरोग्य विमा लाँच

  चेन्नई : स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NSE: STARHEALTH; BSE: 543412) या भारतातील अग्रणी स्वतंत्र आरोग्य विमा

Read More
BusinessLatest News

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने लॉन्च केला ‘डिविडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’

मुंबई: सेवानिवृत्ती योजना म्हणजे तुम्ही काम करणे थांबवल्यानंतरही तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत राहील याची खात्री करणे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने ‘टाटा एआयए डिविडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’ लॉन्च केला आहे. भारतातील सर्वाधिक लाभांश देणाऱ्या मजबूत कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना प्रदीर्घ काळासाठी रिटायरमेंटचा मोठा फंड उभारता यावा, यासाठी या फंडाची खास रचना करण्यात आली आहे. हा फंड मार्केटशी जोडलेल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यासोबतच जीवन विम्याच्या सुरक्षेचा भरवसाही देतो. अशा प्रकारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सातत्याने प्रगती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी हा फंड एक शिस्तबद्ध मार्ग उपलब्ध करून देतो. हा फंड भारतातील अशा ५० सर्वाधिक सातत्याने लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, ज्यांनी बाजारातील प्रत्येक चढ उतारात आपल्या भागधारकांना

Read More
BusinessLatest News

वझीरएक्सने उद्योगक्षेत्रातील सर्वात कमी ट्रेडिंग शुल्कासह क्रिप्टो फ्युचर्स सुरू केले

पुणे : वझीरएक्सने आज क्रिप्टो फ्युचर्स ट्रेडिंग सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे भारतीय ट्रेडर्ससाठी क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग खुले झाले आहे. याची शुल्क

Read More
BusinessLatest News

वी चे नवे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स यंदाच्या सुट्टीतल्या प्रत्येक प्रवासाचा आनंद द्विगुणित करतील

  नवीन आयआर प्लॅन्स प्रवाशांना देणार अधिक पर्याय, लवचिकता आणि सुविधा प्रमुख टेलिकॉम कंपनी वी ने आज आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन, लवचिक इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स आणले आहेत. परदेशात प्रवास करणाऱ्यांना अधिक सोय, स्वातंत्र्य आणि योग्य मूल्य यांचा लाभ घेता यावा, या दृष्टीने हे प्लॅन्स तयार केले गेले आहेत. आता यामध्ये नवीन ७ दिवस, १४ दिवस आणि २१ दिवसांचे खास पॅक्स समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणखी उत्तम पर्याय मिळतील. व्यवसाय, वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा सुट्टीत फिरण्यासाठी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकानुसार योग्य रोमिंग पर्याय मिळावा अशी ग्राहकांची इच्छा असते. ग्राहकांची हीच गरज ओळखून, त्यांना परदेशात असतानाही अखंड संपर्कात राहण्यासाठी अधिक सोय, उत्तम पर्याय आणि पूर्ण नियंत्रण वी मिळवून देत आहे. प्रवासाचा कालावधी कितीही असो, प्रत्येक प्रवाशाच्या सुविधेचा विचार करूनच हे नवीन पॅक्स तयार केले आहेत. बिझनेस मीटिंग किंवा कॉन्फरन्स असो, कौटुंबिक भेट असो किंवा परदेशातील मोठा मुक्काम, वी ग्राहक आता आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकानुसार अगदी परफेक्ट प्लॅन निवडू शकतात. वी च्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पोर्टफोलिओमध्ये आता तब्बल १७ वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्रत्येक कालावधीसाठी ट्रूली अनलिमिटेड डेटा मिळतो, ज्यामुळे ग्राहक परदेशात प्रवास करताना कोणत्याही चिंतेशिवाय आणि अधिक विश्वासाने संपर्कात राहू शकतात. वी ग्राहक अगदी १ दिवसाच्या छोट्या कालावधीपासून ते ३० दिवसांच्या मोठ्या कालावधीपर्यंतचे प्लॅन्स निवडू शकतात – ज्याची माहिती खालीलप्रमाणे आहे: वैधता (दिवस) ४०+ देश, अनलिमिटेड लाभांसह १२०+ देश, लिमिटेड लाभांसह पॅकची किंमत (रु.) डेटा (जीबी)

Read More
BusinessLatest News

पॉलीकॅबने सादर केला एअरोफेम: एक स्टायलिश आणि ऊर्जा-कार्यक्षम बीएलडीसी सीलिंग फॅन

 मुंबई : पॉलीकॅब इंडिया लिमिटेड या भारतातील नंबर १ वायर्स आणि केबल्स कंपनी* आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या एफएमईजी कंपनीने एअरोफेम हा आपला नवीन बीएलडीसी सीलिंग

Read More
BusinessLatest News

सॉल्फिनने ₹280 कोटी उभारले; भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती

पुणे : सॉल्फिन सस्टेनेबल फायनान्सने नुकत्याच पूर्ण झालेल्या गुंतवणूक फेरीत ₹280 कोटी उभारले आहेत आणि आपल्या पूर्णवेळ कामकाजाच्या पहिल्या वर्षातच नफा कमावला

Read More
BusinessLatest News

भारतातील पहिले खासगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन केंद्र विशाखापट्टणममध्ये उभारण्यासाठी ‘भारत फोर्ज’चा आंध्र प्रदेश सरकारशी करार

 पुट्टपर्थी  : ‘भारत फोर्ज लिमिटेड’ने आपल्या एअरोस्पेस व्यवसायाअंतर्गत आंध्र प्रदेश सरकारसोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराअंतर्गत विशाखापट्टणम येथे ‘आंध्र प्रदेश

Read More
BusinessLatest News

‘टीव्हीएस मोटर कंपनीम’ध्ये रवींद्रन शण्मुगम यांची स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती

बंगळुरू : टीव्हीएस वेणू समूहाचा भाग असलेल्या आणि जागतिक स्तरावर दुचाकी व तिनचाकी वाहन निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘टीव्हीएस मोटर कंपनी’ने (टीव्हीएसएम) रवींद्रन शण्मुगम यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती जाहीर केली आहे. भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून ही नियुक्ती १३ मे २०२६ पासून सलग पाच वर्षांसाठी लागू होणार आहे. रवींद्रन शण्मुगम हे अनुभवी तंत्रज्ञान उद्योजक आणि व्यावसायिक नेते आहेत. ग्राहककेंद्रित व्यवसायांचा विस्तार, डिजिटल परिवर्तन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)

Read More
BusinessLatest News

‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स’तर्फे आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातधोरणात्मक संरक्षण प्रकल्पाची पायाभरणी

पुणे  : ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या संरक्षण क्षेत्रातील व्यवसायाशी संबंधित ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ची (केएसएसएल) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स लिमिटेड’ने आंध्र प्रदेशात नवा संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या राज्यातील श्री सत्यसाई जिल्ह्यात मदकसिराजवळ या धोरणात्मक प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. १,००० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या एकात्मिक प्रकल्पासाठी पुढील २ ते ४ वर्षांत सुमारे १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उच्च-सुरक्षा चाचणीच्या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सच्या विशेष क्षमता लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे आधुनिक संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रासाठी महत्त्वाच्या प्रगत एनर्जेटिक्स आणि दारुगोळा प्रणालींमध्ये भारताच्या स्वदेशी क्षमतांना मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ८०० जणांना थेट रोजगार मिळण्याची, तर अंदाजे २,५०० अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळण्यासोबतच एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी आंध्र प्रदेश एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या विशेष साहित्याच्या (एनर्जेटिक्स) आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स’ची स्थापना करण्यात आली आहे. स्वदेशी पातळीवर डिझाइन केलेली, विकसित केलेली आणि जागतिक मानकांनुसार तयार केलेली उत्पादने उपलब्ध करून देणे हा या कंपनीचा उद्देश आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी सुसंगत असून, आयातीसाठी पर्याय निर्माण करणे, स्थानिक मूल्यनिर्मिती वाढवणे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या साहित्यांमध्ये तांत्रिक स्वावलंबन साध्य करणे यावर त्याचा भर आहे. ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, “प्रगत संरक्षण प्रणाली आणि महत्त्वाच्या साहित्यासाठी जागतिक स्तरावर विश्वासार्ह पुरवठादार म्हणून उदयास येण्याची मोठी संधी भारतासमोर आहे. अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स हा स्वदेशी संरक्षण साहित्य क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने उचललेला महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे भारताची जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी अत्याधुनिक संरक्षण साहित्य विकसित करण्यालाही चालना मिळेल.” संरक्षण उत्पादन, धातुकर्म आणि सिस्टिम्स इंटिग्रेशन क्षेत्रातील कल्याणी समूहाच्या सहा दशकांच्या अनुभवाच्या बळावर अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स सुरुवातीपासूनच सर्वोत्तम सुरक्षा मानके, अभियांत्रिकी शिस्त आणि औद्योगिक प्रशासन पद्धती अंगीकारणार आहे. भारताच्या संरक्षण उद्योग परिसंस्थेला अधिक बळकटी देणे, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे आणि विकसित भारत २०४७ या दीर्घकालीन उद्दिष्टात योगदान देणे, यामध्ये कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More
BusinessLatest News

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने केली आणखी एका विक्रमी तिमाहीची नोंद

पुणे : इंटर्नल कम्बशन इंजिन, जनरेटर संच आणि कृषी उपकरणांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेली, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ठसा उमटविलेल्या ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड‘ (KOEL) (BSE:

Read More
BusinessLatest News

‘गोदरेज’कडून ‘फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर

मुंबई: भारतातील मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’ने (जीईजी) आपल्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (एमएचई) व्यवसायाअंतर्गत ‘इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर केले आहे. भारतामध्ये उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग या क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असताना अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा उपायांची गरज वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या बॅटरीमुळे मालकीचा एकूण खर्च २५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास, उपकरणांचा कार्यरत कालावधी वाढण्यास आणि औद्योगिक कामकाज अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे. तसेच ही बॅटरी फोर्कलिफ्टच्या संपूर्ण कार्यकालापर्यंत टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. भारतात औद्योगिक आणि वेअरहाउसिंग यांचा बाजार वेगाने वाढत आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये १.१ कोटी चौरस फुटांहून अधिक जागेचे लीजिंग झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात दुहेरी अंकातील वाढ नोंदवली गेली आहे. थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्री-पीएल), ई-कॉमर्स आणि उत्पादन या क्षेत्रांमुळे पुरवठा साखळीच्या आधुनिकीकरणाला मिळालेली चालना हे यामागचे प्रमुख कारण आहे. गोदामांची संख्या आणि त्यांच्या कामकाजाचा वेग वाढत असताना, ऊर्जा कार्यक्षम, सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार असलेल्या मटेरियल हँडलिंग उपायांची गरज आता उत्पादकता आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. ‘मल्टी आयन बॅटरी’मध्ये जलद आणि ऑपर्च्युनिटी (कामाच्या मधल्या वेळेत) चार्जिंग, शून्य देखभाल खर्च आणि ऊर्जेची उच्च कार्यक्षमता यांसारख्या सुविधा एकत्रितपणे देण्यात आल्या आहेत. तसेच, यामध्ये दुर्मिळ धातूंवरील अवलंबित्व कमी करण्यात आले असून बॅटरीच्या विल्हेवाटीशी संबंधित अडचणीही कमी होतील, याची काळजी घेण्यात आली आहे. भारतामधील आघाडीच्या ‘डीप-टेक बॅटरी इनोव्हेटर्स’पैकी एका कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान तब्बल ५,००० लाईफ सायकल्स देते. हे प्रमाण सामान्य लिथियम-आयन बॅटरींपेक्षा जवळपास ६० टक्के अधिक आहे. त्यामुळे उपकरणाच्या संपूर्ण कार्यकाळासाठी हीच बॅटरी वापरता येते आणि खर्चही कमी होतो. ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमानातही विश्वासार्हरीत्या कार्य करण्यासाठी ही मल्टी आयन बॅटरी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील उष्णकटिबंधीय हवामानासाठी ती विशेष उपयुक्त ठरते. ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट विभागाचे बिझनेस हेड अनिल लिंगायत म्हणाले, “भारतामधील पुरवठा साखळी अधिक व्यापक आणि गुंतागुंतीची होत आहे. अशा वेळी मटेरियल हँडलिंग क्षेत्राला विश्वासार्ह,

Read More
BusinessLatest News

वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे सर्वसमावेशक आरोग्य विम्याची गरज अधोरेखित

मुंबई : भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने आपल्या ‘चुनिये भरोसा, अपनों सा’ मोहिमेच्या पुढील भागात पंकज त्रिपाठी

Read More
BusinessLatest News

टीव्हीएस क्रेडिटने कर्जवाटपात 26% आणि निव्वळ नफ्यात (PAT) 19% वाढ नोंदवली

पुणे : भारतातील अग्रगण्य बिगर बँकिंग वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2025च्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2026मध्ये कंपनीने कर्जवितरणात 26% वाढ नोंदवली. टीव्हीएस क्रेडिटने आर्थिक वर्ष 2026 साठी एकूण 7,196 कोटी रुपये उत्पन्न नोंदवले, जे आर्थिक वर्ष 2025 च्या तुलनेत 9% अधिक आहे; तसेच याच वर्षासाठी कंपनीने कर पश्चात

Read More
BusinessLatest News

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सकडून तरुण भारतासाठी अॅक्टिव्ह युवा हा आरोग्य-केंद्रित विमा प्लॅन लाँच

मुंबई: आदित्य बिर्ला कॅपिटलची आरोग्य विमा शाखा असलेल्या ‘आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ने (एबीएचआयसीएल) आज अॅक्टिव्ह युवा लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा आरोग्य-केंद्रित विमा प्लॅन तरुण भारतीयांच्या बदलत्या जीवनशैली आणि आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या ऑफरचा भाग म्हणून एक सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. हा प्रोग्राम एबीएचआयसीएलच्या हेल्थरिटर्न्स™ संकल्पनेवर आधारित एक व्यापक वेलनेस कार्यक्रम आहे, जो पोषण, फिटनेस आणि रिकव्हरी या क्षेत्रांतील दैनंदिन निरोगी सवयींसाठी ग्राहकांना रिवॉर्ड्स देतो. एबीएचआयसीएलने आपल्या हेल्थरिटर्न्स™ मॉडेलद्वारे आरोग्य विम्याची नवी व्याख्या निर्माण केली आहे. यात दररोज १०,००० किंवा त्याहून अधिक पावले चालणे किंवा एकाच व्यायाम सत्रात ३०० कॅलरी कमी करणे यांसारख्या आरोग्यदायी क्रियांद्वारे

Read More
BusinessLatest News

‘भारत फोर्ज’चा ‘एमब्रेअर’शी लँडिंग गिअर फोर्ज्ड घटकांच्या उत्पादनासाठी दीर्घकालीन करार; एअरोस्पेस क्षेत्रात मोठी कामगिरी

पुणे : भारत फोर्ज लि. (बीएफएल) या प्रगत फोर्जिंग आणि अचूक अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने एमब्रेअर या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत दीर्घकालीन करार केला आहे. या कराराअंतर्गत भारत फोर्ज कंपनी लँडिंग गिअरसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या फोर्ज्ड (घडवलेल्या धातूच्या) भागांचे उत्पादन आणि पुरवठा करणार आहे. फोर्ज्ड घटकांसाठी ‘एमब्रेअर’च्या जागतिक एअरोस्पेस पुरवठा साखळीत सहभागी होणारी भारत फोर्ज ही भारतातील पहिली पुरवठादार कंपनी ठरली आहे. या करारानुसार, ‘एमब्रेअ’रच्या व्यावसायिक आणि संरक्षक विमानांच्या लँडिंग गिअर सिस्टीमसाठी उच्च दर्जाचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे फोर्ज्ड

Read More
BusinessLatest News

सोनीकडून एक्‍सआर प्रोसेसर आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह BRAVIA 3II सादर

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज BRAVIA 3II लाँच करण्याची घोषणा केली, जी ग्राहकांच्या घरगुती मनोरंजनाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल. सोनीच्या प्रीमियम टेलिव्हिजन श्रेणीतील

Read More
BusinessLatest News

‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला ‘स्कायट्रॅक्स’च्या पहिल्या ऑडिटमध्ये जागतिक विमान कंपनीचे ‘फोर-स्टार रेटिंग’

पुणे : ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला स्कायट्रॅक्स या संस्थेने जागतिक विमानसेवेतील चार तारांकित मानांकन दिले आहे. कंपनीच्या पहिल्या संपूर्ण तपासणीनंतर तिला हे मानांकन मिळाले

Read More