fbpx
Monday, May 20, 2024
BusinessLatest News

जपानच्या सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपने वृद्धीला चालना देण्यासाठी एसएमएफजी इंडिया क्रेडिटमध्ये केली 1,300 कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई :  सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपने (SMFG) एसएमएफजी इंडिया क्रेडिट कं. लि.मध्ये राइट्स इश्युच्या माध्यमातून 1,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. (पूर्वी फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लि.) SMICC ने त्याच्या पूर्ण मालकीच्या एसएमएफजी इंडिया गृहफायनान्स कं.लि.मध्ये 150 कोटी रुपये गुंतवले आहेत. (पूर्वी फुलरटन इंडिया होम फायनान्स कंपनी लि.) (एसएमएफजी गृहशक्ती).

या घडामोडीवर भाष्य करताना, SMICC चे मुख्य वित्तीय अधिकारी पंकज मलिक म्हणाले, “आमचा विश्वास आहे की, एसएमएफजीद्वारे गुंतवण्यात आलेला 1,300 कोटींचा निधी SMICC साठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ही धोरणात्मक वाटचाल आमच्या विस्ताराच्या प्रयत्नांना बळकट करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. देशातील सेवा नसलेल्या लोकसंख्येसाठी, परवडणारे गृहनिर्माण फायनान्स सोल्यूशन्स आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी SMICC ने एसएमएफजी गृहशक्तीमध्ये INR 150 कोटी गुंतवले आहेत. या गुंतवणुकीच्या आधारे, आम्ही आमच्या बाजारपेठेतील उपस्थिती वाढविण्यास, शाश्वत वाढ करण्यास आणि आमच्या ग्राहकांना मूल्य प्रदान करण्यास तयार आहोत.”

31 डिसेंबर 2023 रोजी SMICC ची ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 42,487 कोटी रुपये होती, यात 24% वार्षिक वाढ झालेली आहे. एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीसाठीचे वितरण 28,790 कोटी रुपये होते जे 46% ची वार्षिक वाढ दर्शवते. कंपनीने आपली उपस्थिती देशभरातील 990 शाखांमध्ये विस्तारली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading