रेनॉ इंडिया देशभरात समर कॅम्प सुरू करणार
नवी दिल्ली : – ग्राहक समाधानामध्ये वाढ करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहण्याच्या उद्देशासह रेनॉ इंडियाने देशभरात विक्री-पश्चात्त सेवा उपक्रम ‘रेनॉ समर कॅम्प’च्या शुभारंभाची घोषणा केली आहे. हा सर्विस कॅम्प भारतभरातील सर्व रेनॉ सर्विस सुविधांमध्ये १३ मे ते २० मे २०२४ पर्यंत आयोजित करण्यात येईल.
कार्सची सानुकूल कार्यक्षमता हे सर्विस कॅम्पचे आयोजन करण्याचे मुख्य ध्येय आहे. प्रशिक्षित व कुशल टेक्निशियन्सकडून वाहनांची सखोल तपासणी करण्यात येईल. रेनॉ इंडियाने स्थापित केलेल्या नियमनांनुसार समर कॅम्प रेनॉ मालकांसाठी प्रखर कार तपासणीसह मोफत कार टॉप वॉश अशा सर्वोत्तम सेवा देईल. तसेच, कारच्या सर्व महत्त्वपूर्ण कॉम्पोनण्ट्सची बारकाईने तपासणी करण्यात येईल. अशा प्रकारच्या नियमित तपासण्यांमधून सुधारित वेईकल कार्यक्षमतेसाठी आवश्यक सर्व उपायांची खात्री मिळते, तसेच ग्राहकांना समानधारकारक मालकीहक्क अनुभव मिळतो.
रेनॉ समर कॅम्पचा भाग म्हणून रेनॉ इंडिया ग्राहक निवडक पार्टस् व अॅक्सेसरीजवर किमान १५ टक्के आकर्षक सूट ऑफर्स, इंजिन ऑईल रिप्लेसमेंटवर १० टक्के सूट, लेबर चार्जेसवर १५ टक्के सूट, एसी सर्विसिंगवर स्पेशल ऑफर्स यांचा लाभ घेऊ शकतात. रेनॉ इंडिया एक्स्टेण्डेड वॉरंटीवर १० टक्के सूट आणि रोड-साइड असिस्टण्स रिटेल प्रोग्रामवर १० टक्के सूट देखील देईल.
सध्या, रेनॉ इंडियाची देशभरात ४०० हून अधिक सेल्स आणि ४३० हून अधिक सर्विस टचपॉइण्ट्सची व्यापक उपस्थिती असण्यासह बेंचमार्क विक्री व सेवा दर्जा आहे.
कारची सर्वसमावेशक तपासणी करण्याच्या सुविधा देण्याव्यतिरिक्त ग्राहकांसाठी विविध धमाल क्रियाकलापांचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये खात्रीदायी गिफ्ट्स मिळतील. ज्यामुळे ग्राहकांसाठी हा उत्साहवर्धक व आनंददायी अनुभव ठरेल. रेनॉच्या या सर्व विक्री-पश्चात्त उपक्रमांमधून ग्राहकांना समाधान प्रदान करण्याप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते.
रेनॉने ग्राहकांना विनासायास ब्रँड मालकीहक्क अनुभव देण्यासाठी अनेक अद्वितीय विक्री-पश्चात्त आणि ग्राहक-केंद्रित उपक्रम राबवले आहेत. यामध्ये रेनॉ सेक्युअर, रेनॉ असिस्ट, रेनॉ ईजी केअर, वर्कशॉप ऑन व्हील्स (डब्ल्यूओडब्ल्यू), माय रेनॉ अॅप आणि नियमित कस्टमर सर्विस कॅम्प्स यांचा समावेश आहे. भारतातील दशकभराच्या उपस्थितीमध्ये रेनॉने मोठी प्रगती केली आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक उत्पादन केंद्र, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केंद्र, भारतातील लॉजिस्टिक्स व डिझाइन केंद्र यांचा समावेश आहे. कंपनीचे अद्वितीय उत्पादन धोरण आणि अग्रगण्य ग्राहक समाधान उपक्रमांचे पाठबळ असलेला हा प्रबळ पाया रेनॉच्या भारतातील यशस्वी प्रवासासाठी साह्यभूत राहिला आहे.
