Tuesday, November 10, 2026
Latest NewsSports

‌‘ऑक्सिरीच करंडक‌’ महिला आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !!



पुणे :  पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने शहरातील महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच ‌‘ऑक्सिरीच करंडक‌’ महिला आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १२ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुलींच्या आणि महिलांच्या क्रिकेटचा अधिकाधिक विकास व्हावा, नवोदित आणि गुणवान खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठी उपलब्ध व्हावे तसेच त्यांना स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या आंतरक्लब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे सामने हिंजेवाडी येथील फोरस्टार क्रिकेट मैदानावर होणार आहेत.

स्पर्धेचे सचिव राजू कोतवाल यांनी सांगितले की, या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंना आगामी पिंपरी चिंचवड महिला प्रिमियर लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे शहरातील महिला क्रिकेटपटूंना मोठ्या स्पर्धांसाठी आपली गुणवत्ता सिध्द करण्याची उत्तम व्यासपीठ मिळणार आहे.

स्पर्धेसाठी एकून ३० हजार रूपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला १५ हजार रूपये आणि करंडक, उपविजेत्या संघाला १० हजार रूपये आणि करंडक आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला पाच हजार रूपये आणि करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट बॅटर, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अष्टपैलु खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही देण्यात येणार आहे.

स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी, एसएसए क्रिकेट ॲकॅडमी, क्रिकफिट क्रिकेट ॲकॅडमी, एस.पी. राठोड इलेव्हन, स्कोअर स्पोर्ट्‌‍स क्रिकेट ॲकॅडमी, लक्ष क्रिकेट ॲकॅडमी, एमबीसीएस क्रिकेट संघ, मॅव्हरिक्स क्रिकेट क्लब आणि ॲम्बिशियस क्रिकेट क्लब हे संघ झुंझणार आहेत. स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरी या पध्दतीने होणार आहेत.

Leave a Reply