दिवाळी व भाऊबीज निमित्त महिला पोलिसांना भेटवस्तू – स्वान फाऊंडेशनचा ६ व्या वर्षीही उपक्रम
पुणे : दिवाळी आणि भाऊबीज निमित्त पुणे शहरातील महिला पोलिसांना स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या वतीने गेली ६ वर्षे भेटवस्तू देण्यात येत आहेत. यावर्षी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलिसांना भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गोहर हसन (IPS), शंकर ककडे, प्रसिद्ध उद्योगपती पंकज डहाणूकर, डॉ. इफ्तार पठाण, स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, अभिजित मोडक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या, “स्वान फाऊंडेशन आणि शशिकांत कांबळे हे गेली ६ वर्षे महिला पोलिसांसाठी भाऊबीज निमित्त हा कार्यक्रम करत आहेत.मी ज्या ज्या ठिकाणी होते तिथे म्हणजेच सातारा, सोलापूर, मुंबई आणि आता पुणे या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.सणासुदीला कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांसाठी हा भाऊबीजेचा आनंद खूप मोठा आहे.
यावेळी स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, “आमच्यासाठी हा कार्यक्रम नाही, हे आमचं कर्तव्य आहे. ज्या महिला पोलीस दिवाळीत आपल्या मुलांना सोडून आपल्यासाठी ड्युटी करतात, त्यांना एका भावाने भाऊबीजेला आठवण करून देणं, हेच खरं नातं आहे. जोपर्यंत स्वान फाऊंडेशन आहे, तोपर्यंत हा उपक्रम कधीच थांबणार नाही.”
