fbpx
Monday, May 20, 2024
BusinessENTERTAINMENTLatest News

पीव्हीआर आयनॉक्सतर्फे कोपा मॉल येथे पहिला सुपर प्रीमियम डिरेक्टर्स कट सिनेमा आणि ICE थिएटर्स®

पुणे :  पीव्हीआर आयनॉक्स या भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रीमियम सिनेमा प्रदर्शक कंपनीने आज पुण्यातील कोपा मॉल या पहिल्या लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशनमध्ये ७ स्क्रीन मल्टीप्लेक्स सुरू केल्याचे जाहीर केले. यात देशातील आघाडीचा लक्झरी सिनेमा फॉरमॅट, डिरेक्टर्स कट आणि इमर्सिव्ह ICE थिएटर्स® यांचा समावेश असून पश्चिम भागात ही सोय पहिल्यांदाच उपलब्ध केली आहे.

या सिनेमाचा सर्वात उल्लेखनीय पैलू म्हणजे, पीव्हीआर आयनॉक्सच्या ‘द लक्झरी कलेक्शन’ पोर्टफोलिओमध्ये ५ डिरेक्टर्स कट ऑडिओटोरियम्सचा समावेश करण्यात आला आहे. ही सोय देशभरात सिनेमा पाहाण्याचा सर्वात अभिजात आणि तल्लीन अनुभव देणारी म्हणून प्रसिद्ध आहे. या सिनेमामध्ये ICE थिएटर्स® आणि प्रीमियर ऑडिटोरियमचा समावेश करण्यात आला असून तिथे आधुनिक सजावट, उच्च दर्जाचा आरामदायीपणा आणि ४के लेसर प्रोजेक्शन व डॉल्बी अटमॉस साउंड, नेक्स्ट जनरेशन थ्रीडीसारख्या अत्याधुनिक सिनेमा तंत्रज्ञानाचा अनुभवही घेता येतो. त्याच्यासमोरच असलेल्या ‘गॅटस्बी रेस्टो बार’मुळे सिनेमाचा शानदार अनुभव आणि उच्चभ्रू डायनिंग यांचा एकत्र आनंद घेता येतो. वेगवेगळ्या स्वादांचे पॉपकॉर्न देणारे ‘पॉपकॉर्न बार’, आधुनिक काँटिनेंटल डिशेस खिलवणारे ‘ला क्युझिन’ आणि अस्सल सुशी देणारे ‘सिम्प्ली सुशी’ यांचा त्यात समावेश आहे.

नवीन सिनेमामध्ये ७५१ प्रेक्षकांची बसण्याची सोय असून पुण्यातील या उच्चभ्रू सुविधेमुळे पीव्हीआर आयनॉक्सचा महाराष्ट्रातील ५५ सिनेमाजमधील २७७ स्क्रीन्ससह फुटफॉल आणखी वाढेल. कंपनीने पश्चिम भारतात ७९ सिनेमाजमधील ३६७ स्क्रीन्ससह आपला विस्तार वाढवला आहे.

विस्तार योजनेविषयी पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली म्हणाले, “पहिले ICE थिएटर® आणि पहिला डिरेक्टर्स कट अनुभव पश्चिम भागात – पुण्यात आणताना आम्हाला आनंद होत आहे. या शहराची समृद्ध संस्कृती, बहुभाषिकता, सिनेमाची सखोल जाण लक्षात घेता आमच्या नव्या व्हेंचरसाठी कोपासारखे या शहरातील प्रतिष्ठित लाइफस्टाइल हब सर्वात योग्य आहे. आमच्या नव्या आउट-ऑफ-होम डेस्टिनेशन लाँचच्या माध्यमातून पुण्यातील सांस्कृतिक चळवळीला हातभार लावण्याचे आणि प्रेक्षकांना भव्य सिनेमा व मनोरंजनाचा समग्र अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे.”

“कोपामध्ये आम्ही खरेदी व डायनिंगच्या अनुभवाचा अनोखा मेळ घालत पुण्याला आधुनिक जीवनशैली मिळवून देणारे विविध ब्रँड्स आम्ही उपलब्ध केले आहेत. पीव्हीआर डिरेक्टर्स कट राज्यात उपलब्ध करून देण्यासाठी कोपाची निवड केल्याबद्दल आम्ही आमचे भागीदार पीव्हीआर आयनॉक्सचे आभारी आहोत. हा आमच्या कंपनीच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे कोपामध्ये येणाऱ्या विविध अनुभव देण्याची आमची बांधिलकी जपली गेली आहे.” असे लेक शोअरचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अश्विन पुरी म्हणाले.

डिरेक्टर्स कट पीव्हीआर आयनॉक्समधील आलिशानतेचा सर्वोच्च बिंदू असून त्यामुळे अभिरूचीपूर्ण, दर्जेदार हॉस्पिटॅलिटी व मनोरंजनाचा नवा मापदंड तयार झाला आहे. अत्याधुनिक ऑडिटोरियम्सपासून, जागतिक दर्जाचे प्रोजेक्शन व सराउंड साउंड, ब्लँकेट व उशीसह पूर्णपणे रिक्लेमेबेल आर्म-चेयर्स, वैयक्तिक अटेंडट कॉल सिस्टीम, आकर्षक इन-सीट खाद्यपदार्थ व बेव्हरेज मेन्यू, लक्झरी लाउंजेसपासून प्रत्येक गोष्ट बारकाईने व प्रेक्षकांना जास्तीत जास्त आराम देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

“आमचे एक्सक्लुसिव्ह डिरेक्टर्स कट आणि ICE थिएटर्स® च्या माध्यमातून उच्च दर्जाचे सुपर ऑडिटोरियम उभारण्यासाठी सिनेमाची श्रीमंती खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या पुण्यासारख्या शहराची निवड करणे स्वाभाविक होते. गॅटस्बीमधून आम्ही दर्जेदार गॉरमे डायनिंग देणार असून रेस्टो बार कॉन्सेप्टही खास तयार करण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांचा सिनेमा पाहाण्याचा अनुभव आणखी रंगतदार होईल.” असे पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडच्या द लक्झरी कलेक्शन अँड इनोव्हेशनचे प्रमुख श्री. रेनॉ पॅलिएर म्हणाले.

फ्रान्सचे अत्याधुनिक ICE इमर्सिव्ह तंत्रज्ञान सेन्सोरियल अनुभव देणारा असून त्यात ऑडिटोरियमच्या दोन्ही बाजूला एलईडी पॅनेल्सचा समावेश आहे. यामुळे सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांचे पेरिफेरियल व्हिजन पूरक रंग व आकारांनी भरून जाते आणि पर्यायाने मुख्य स्क्रीनवरील दृश्य आणखी उठावदार होते. व्हिज्युअल अनुभव ४के प्रोजेक्शनने आणखी खास झाले असून ऑप्टिमल ऑडिओ प्लेबॅक थ्रीडी डॉल्बी अटमॉसमुळे ते जास्त सजीव होते. खास बनवण्यात आलेल्या ६० सेमी रूंद सीट्स गोलाकार पद्धतीने बसवण्यात आल्यामुळे स्क्रीनकडे पाहाणे सुखद होते.

आधुनिक सजावट आणि दर्जेदार सजावटीसह सिनेमात पांढरा, काळा व करड्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. सिनेमा पाहाण्याचा अनुभव आणखी उंचावण्यासाठी बारकाईने तयार करण्यात आलेली ही सुविधा प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी व त्यांना असामान्य अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading