‘टीआयईटी’तर्फे बीई, बी-टेक प्रोग्रामसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु
पुणे : थापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीने (टीआयईटी) बीई आणि बी-टेक प्रवेश प्रक्रिया २०२४साठी (डीम्ड युनिव्हर्सिटी) अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. जेईई मेन २०२४ची अखिल भारतीय रँक ( ऑल इंडिया रँक) आणि १२वी इयत्तेतील ‘पीसीएम’चे (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गुण लक्षात घेऊनच हे प्रवेश दिले जाणार आहेत. यानंतरचे प्रवेश केवळ डिप्लोमा धारकांसाठी आरक्षित असू शकतील, त्यात इयत्ता १० वीनंतर तीन वर्षांचा कालावधी किंवा इयत्ता १२ वी नंतर दोन वर्षांचा डिप्लोमा किमान ६० टक्के (एससी/एसटीसाठी ५५ टक्के) गुणांची पात्रता ठेवण्यात आली आहे. संस्थेच्या विविध शाखांमध्ये ३००० हून अधिक जागा असतील.
‘टीआयईटी’ला संशोधन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सहाहून अधिक दशकांचा वारसा असून भारतातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांमध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग) संस्थेने २०वा क्रमांक पटकावला आहे. म्हणूनच ‘टीआयईटी’ अभियांत्रिकी इच्छुकांसाठी प्रमुख पसंतीची संस्था ठरली आहे. संस्था विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी कटिबद्ध असून, पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि आर्थिक शिष्यवृत्तीद्वारे भरीव आधार देते. गेल्या वर्षी याद्वारे तब्बल ३२ कोटीहून अधिक रकमेचा लाभ संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळाला, ज्यामुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार झाले.
दरम्यान, संस्थेत आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी कार्यक्रमही (आयईपी) असून, ट्रिनिटी कॉलेज डब्लिन, क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी, व्हर्जिनिया टेक, तेल-अविव युनिव्हर्सिटी आणि न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटी यांसारख्या जगभरातील नामांकित भागधारक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते.
थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचाल डॉ. पद्मकुमार नायर यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या परिवर्तनशील स्वरूपावर प्रकाश टाकला. तसेच सतत बदलणाऱ्या, गतिमान जगाशी जुळवून घेण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही त्यांनी भर दिला. शिक्षण म्हणजे स्वतःला जाणून घेत जीवनाची तयारी करणे, बौद्धिक नम्रता प्राप्त करणे आणि शेवटी शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रवासात प्रवेश करणे, आदी समजून घेण्यासाठी डॉ. नायर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात.
अभियांत्रिकीमधील प्रमुख अभ्यासक्रमांव्यतिरिक्त, ‘टीआयईटी’ अन्य शैक्षणिक अभ्यासक्रमांची सुविधा देते. यामध्ये थापर स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमधील बीबीए/बीए/बीएससी/बीकॉम आदी पदवी अभ्यासक्रम; एमई/एम-टेक, एमएससी, एमए, एमबी आदी पदव्युत्तर अभ्यासक्रम; अभियांत्रिकी, विज्ञान आणि व्यवस्थापनात डॉक्टरेट (पीएचडी) आदींचा यामध्ये समावेश आहे.
‘टीआयईटी’ने आपली उत्कृष्टता वाढवण्यासाठी माहिती केंद्राची स्थापना केली आहे, ज्याद्वारे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक माहिती सुलभरितीने उपलब्ध होईल. टीआयईटीमधील विविध अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहितीसाठी अनुभवी प्राध्यापकांद्वारे प्रशिक्षण कार्यशाळांचे सत्र आयोजित केले जाते, ज्याची सर्वसमावेशक शिक्षण इकोसिस्टममध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुकांना मदत होते. अधिक माहितीसाठी संस्थेच्या http://www.thapar.edu/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
