Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

ओडीसी इलेक्ट्रिककडून पुण्‍यामध्‍ये सर्वात किफायतशीर एसएनएपी हाय-स्‍पीड आणि ई२ लो-स्‍पीड स्‍कूटर लाँच

 

पुणे : ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक वेईकल उत्‍पादक कंपनीने पुण्‍यामध्‍ये दोन अत्‍याधुनिक स्‍कूटर मॉडेल्‍स एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर आणि ई२ लो-स्‍पीड स्‍कूटरच्‍या लाँचची घोषणा केली. ओडिसी इलेक्ट्रिक लाइनअपमधील ही नाविन्‍यपूर्ण भर पाहता भारतातील इलेक्ट्रिक वेईकल क्षेत्रामध्‍ये क्रांती घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल निदर्शनास येते. एसएनएपी हाय-स्‍पीड सकूटर एक्‍स-शोरूम मुंबई किंमत ७९,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे, तर ई२ लो-स्‍पीड मॉडेलची किंमत ६९,९९९ रूपये आहे.

या लाँचसोबत ओडीसीची वर्षभरात पुण्‍यामध्‍ये ५ डिलरशिप्‍स सुरू करण्‍याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. पुण्‍यामध्‍ये प्रबळ स्‍टार्टअप इकोसिस्‍टम आहे, जी उद्योजकांना विविध पर्क्‍स, संसाधने आणि विविध प्रकारचे उद्योग उपलब्‍ध करून देते, ज्‍यामुळे पुणे शहर डिलरशिप नेटवर्क्‍स स्‍थापित करण्‍यासाठी उत्तम साइट आहे.

एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर शाश्‍वततेबाबत तडजोड न करता उत्‍साहवर्धक राइडिंग अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २००० वॅट्सचे सर्वोच्‍च मोटर आऊटपुट आणि प्रतितास ६० किमीच्‍या टॉप स्पीडसह एसएनएपी अद्वितीय कार्यक्षमता व गतीशीलता देते. सिंगल चार्जमध्‍ये १०५ किमीची रेंज आणि ४ तासांपेक्षा कमी चार्जिंग वेळेसह एसएनएपी सुलभ व विश्‍वासार्ह शहरी प्रवासाची खात्री देते. या स्‍कूटरमध्‍ये नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वॉटरप्रूफ आयपी६७ मोटर, शक्तिशाली भारतीय चेसिस, तसेच एआयएस १५६ सर्टिफाईड स्‍मार्ट बॅटरी (एलएफपी), जी अग्निरोधक, दीर्घकाळापर्यंत टिकाऊ आणि देखरेख करण्‍यास सोपी आहे. तसेच, एसएनएपीमध्‍ये अचूक बॅटरी लेव्‍हल मॉनिटरिंग आणि डिस्‍टन्‍स-टू-एम्‍प्‍टी कम्‍प्‍युटेशनसाठी सीएएन-सक्षम डिस्‍प्‍ले, तसेच सुधारित सोयीसुविधेसाठी क्रूझ कंट्रोल आहे.

ई२ लो-स्‍पीड स्‍कूटर विश्‍वसनीयता व शाश्‍वततेचा शोध घेणाऱ्या शहरी राइडर्ससाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २५० वॅट्सची मोटर शक्‍ती आणि प्रतितास २५ किमीच्‍या अधिकतम स्‍पीडसह ई२ सुरक्षितता व शाश्‍वततेला प्राधान्‍य देते. सिंगल चार्जमध्‍ये ७० किमीची रेंज आणि फक्‍त ४ तासांच्‍या चार्जिंग वेळेसह ई२ शहरामध्‍ये विनासायास प्रवासासह पर्यावरणावर कमी परिणाम होण्‍याची खात्री देते.

ओडिसी इलेक्ट्रिकचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी नेमिन वोरा म्‍हणाले, “ओडिसी इलेक्ट्रिकमध्‍ये आम्‍ही शाश्‍वत व नाविन्यपूर्ण सोल्‍यूशन्‍ससह इलेक्ट्रिक गतीशीलता लँडस्‍केपला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न करतो, जे ग्राहकांना सक्षम करण्‍यासोबत हरित भविष्‍याप्रती योगदान देतात. एसएनएपी हाय-स्‍पीड स्‍कूटर आणि ई२ लो-स्‍पीड स्‍कूटरच्‍या लाँचसह आम्‍ही सर्वोत्तमता, शाश्‍वतता आणि ग्राहक समाधानाप्रती आमची अविरत कटिबद्धता दाखवत आहोत. आमचा विश्‍वास आहे की, या नवीन ऑफरिंग्‍ज भारतामध्‍ये आणि भारताबाहेर इलेक्ट्रिक दुचाकींसाठी नवीन मानक स्‍थापित करतील. तसेच, पुणे शहर ओडिसीला आपली उपस्थिती वाढवण्‍यासाठी आणि इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी उत्‍साहवर्धक संधी देते.”

२०२० मध्‍ये स्‍थापना झाल्‍यापासून ओडिसी इलेक्ट्रिक भारतातील इलेक्ट्रिक वेईकल लँडस्‍केपमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती अग्रस्‍थानी आहे. आपल्‍या पर्यावरणास अनुकूल आणि तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत ऑफरिंग्‍जसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओडिसी इलेक्ट्रिकला सर्वोत्तमता, नाविन्‍यता व शाश्‍वततेप्रती अविरत कटिबद्धतेकरिता आंतरराष्‍ट्रीय मान्‍यता मिळत आहे. इच्‍छुक ग्राहक चौकशी, टेस्‍ट राइड्स आणि इतर कोणत्‍याही सहाय्यतेसाठी श्री. निलेश भटामेबेकर – ७५०६३००११७ यांच्‍याशी संपर्क साधू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading