मदर्स रेसिपीकडून केवळ रु 40 मध्ये वापरायला सोपा डाळ पाडप पॅक सादर
पुणे : अस्सल आणि चवीसाठी ओळखला जाणारा भारतातील आघाडीचा खाद्यपदार्थांचा ब्रँड असलेल्या मदर्स रेसिपी’ने पुणे आणि नागपूरच्या रहिवाशांसाठी 100 ग्रॅम डाळ पापड पॅकची घोषणा केली. हे नव्याने सुरू केलेले पापड उदीड आणि मूग अशा दोन वेगवेगळ्या प्रकारात मिळणार आहेत. (Introducing Easy to Use Dal Padap Pack at just Rs 40 from Mother’s Recipe)
चवीशी तडजोड न करता वापरायला अगदी सोपी असलेली लहान पाकिटे मदर्स रेसिपीने तयार केली आहेत. हा ब्रॅंड पुन्हा एकदा गुणवत्ता आणि चवदार उत्पादने घेऊन आला आहे. वर्षानुवर्षे हा ब्रँड याच वैशिष्ट्यांसाठी लोकप्रिय आहे. प्रत्येक पाकिटाची किंमत खिशाला परवडणारी असून 100 ग्रॅमसाठी फक्त रु. 40 याप्रमाणे असल्याने तो घरांसाठी एक चोख पर्याय ठरतो.
‘मदर्स रेसिपी’ च्या एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर संजना देसाई म्हणाल्या की, ‘”मदर्स रेसिपी’मध्ये आम्ही भारतीय पाककृतीला साजेशी अस्सल चव देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या नवीन 100 ग्रॅम डाळ पापड पॅकसह, ग्राहकांना आवडणाऱ्या पारंपरिक स्वादांशी तडजोड न करता उत्पादन उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
गुणवत्तापूर्ण डाळी, काळजीपूर्वक निवडलेले मसाले आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पाककृतींचा वापर करून उडद आणि मूग पापड प्रकार तयार केले जातात. हे कुरकुरीत डाळ पापड केवळ जेवणाची लज्जत वाढविणारे नसून, ते चविष्ट स्नॅक्स देखील आहे तसेच रु. 40 च्या परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे.
ग्राहकांना ही उत्पादने त्यांच्या नजिकच्या दुकानात आणि आघाडीच्या सुपरमार्केटमध्ये सहज मिळतील.
