Tuesday, September 8, 2026
ENTERTAINMENTLatest News

मी जिंकून घेईन सारं मालिकेत रंगणार राजगुरूंची पहिली मंगळागौर!

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ मध्ये सध्या मंगळागौरीच्या विशेष भागांची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या उत्सवा निमित्त राजगुरू वाड्यात पारंपरिक खेळ खेळले जाणार असून, शांभवी, छवी आणि घरातील इतर बायकांनी सुंदर नऊवारी साड्या आणि पारंपरिक दागिन्यांचा असा खास साज-शृंगार केला आहे, ज्यामुळे या सणाचा उत्साह आणखी वाढला आहे. या उत्साहाच्या वातावरणात आनंदाचे डोहाळे असतानाच, अनेक नाट्यमय घडामोडी आणि खळबळजनक वळण येताना दिसत आहेत. मी जिंकून घेईन सारं मालिकेत रंगणार राजगुरूंची पहिली मंगळागौर.
पहा ७ आणि ८ सप्टेंबरला संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर !

राजगुरू वाड्यात मंगळागौरीची जय्यत तयारी सुरू असताना, जेसिकाच्या अनपेक्षित एन्ट्री होणार आहे. जेसिकाची भूमिका अभिनेत्री सानिका काशीकर साकारणार आहे. या भूमिकेबद्दल सांगताना सानिका म्हणाली, “मला वाटतं हा रोल माझ्यासाठीच लिहिला गेला आहे. कलाकाराला इतक्या शेड्सचा रोल करायला मिळणं हे भाग्य आहे. मला या कॅरेक्टरवर खूप प्रेम आहे. सुरुवातीपासूनच लूक, कॉस्च्युम ते मेकअप या सगळ्याची मी वाट पाहत होते, जो अतिशय क्लासी आणि कमाल-रिच असेल.” आपल्या या नवीन प्रोजेक्टबद्दल बोलताना तिने एक आठवण शेअर केली, “सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे, ज्या दिवशी मला सकाळी ८ वाजता याबद्दलचा कॉल आला, त्याच्या अगदी आधीच मी माझी ‘मॅनिफेस्टेशन’ डायरी पेन बंद करून ठेवली होती. मला तेव्हा असं वाटलं की माझं मॅनिफेस्टेशन किती लवकर पूर्ण झालं. मला असं वाटतं एखादी गोष्टी मनापासून मागितली कि ती मिळतेच. मॅनिफेस्टेशन करावं इच्छा पूर्ण नक्कीच होतात. मला खात्री आहे प्रेक्षकांना हि भूमिका नक्कीच आवडेल.”

जेसिकाच्या या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळेच वळण मिळणार आहे, तर दुसरीकडे शांभवी छवीचा आनंद मातीत मिळवण्यासाठी आणि तिच्याविरुद्ध कट रचण्यासाठी जेसिकाशी हातमिळवणी करेल का ? छवीला अनिकेतसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतात, परंतु शांभवी आणि जेसिका तिच्या या सुंदर क्षणात अडथळे निर्माण करतील का? दरम्यान, या सगळ्या षडयंत्रांना आणि संकटांना छवी कशी तोंड देणार? शांभवी आणि जेसिकाचा हा डाव छवी आणि अनिकेतच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचे हे विशेष भाग ७ आणि ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading