fbpx
Monday, June 17, 2024

Day: September 12, 2020

ENTERTAINMENTTOP NEWS

ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून आणखी एकाला अटक

अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, दिग्दर्शक मुकेश छाब्रा सह 5 जणांची नावे रियाने घेतली
ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून आणखी एकाला अटक

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज 22 हजार 84 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

मागील 24 तासांत राज्यात 22,084 नवे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 37 हजार 765 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यात 13,489 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडा 7 लाख 28 हजार 512 वर पोहोचला आहे. राज्यात मागील 24 तासांत 391 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Read More
NATIONALTOP NEWS

Good news – ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचण्यांना दिलेली स्थगितीही उठवण्यात आली

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोविड-१९ लस संदर्भात दोन चांगल्या बातम्या आहेत. एकीकडे भारतीय बनावटीच्या ‘कोव्हॅक्स’च्या चाचण्यांना चांगले यश येताना दिसत आहेत. तसेच ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचण्यांना दिलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे.

Read More
MAHARASHTRA

प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे – आरोग्य मंत्री राजेश टोपे

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 200 खाटांच्यावर असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याची, माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शनिवारी राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात कोरोना हॉस्पिटलमध्ये 40 बेडच्या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते

Read More
MAHARASHTRA

साहित्यिक माधव कोंडविलकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, कवी, शिक्षक आणि दलित लेखक माधव गुणाजी कोंडविलकर यांचे काल रात्री निधन झाले. गेले तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. माधव कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे पुस्तक खूपच गाजले होते. कोंडविलकर यांचे दैनंदिनीवजा आत्मकथन म्हणून हे पुस्तक ओळखले जाते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलीत. अजून उजाडायचं आहे, आता उजाडेल!, भूमिपुत्र अशी त्यांची काही पुस्तके गाजलीत.

Read More
PUNE

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार

Read More
Business

अयोध्याच्या श्री राम मंदिराला बेंजर पेंट्स रंग देणार

अयोध्याच्या श्री राम मंदिराला बेंजर पेंट्स रंग देणार

Read More
ENTERTAINMENTMAHARASHTRATOP NEWS

कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘रावण’च्या रूपातील चित्र केले ट्विट

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) च्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारला. त्यानंतर कंगनाने थेट  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर ट्वीटच्या माध्यमातून टीका करण्यास सुरुवात केली. आता कंगनाने अजून एक ट्वीट केले आहे. मुख्य म्हणजे हे ट्वीट मराठीत असून यामध्ये तिने उद्धव ठाकरे यांचे रावणाच्या  रूपातील चित्र पोस्ट केले आहे. हे चित्र कंगनाला तिचे मित्र विवेक अग्निहोत्री यांनी पाठवले असल्याचे तिने सांगितले आहे.

Read More
ENTERTAINMENT

शाहरुख खान आणि जॉन अब्राहम ‘या’ चित्रपटात एकत्र झळकणार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यशराज फिल्म्स च्या ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेता जॉन अब्राहमदेखील (John Abraham) महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत.

Read More
ENTERTAINMENT

‘चोरीचा मामला’ येणार 5 भाषांमध्ये

काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या “चोरीचा मामला” या चित्रपटाच्या नावावर आता नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. मल्लाळम, तेलुगू, तमीळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती होणार असून, पाच भाषांमध्ये होणारा “चोरीचा मामला” हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

Read More
NATIONALTOP NEWS

कोरोना विषाणू मानवनिर्मित? – चीनमधून पळून गेलेले शास्त्रज्ञ लवकरच सादर करणार पुरावे

चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना संसर्ग संपूर्ण जगभर थैमान घालतो आहे. हा विषाणू  कृत्रिम  की नैसर्गिक यावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे याविषयी चीनकडे अख्ख्या जगाचं लक्ष आहे. त्यातच, चीनचे प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यांनी हा विषाणू मानवनिर्मितच असून आपण लवकरच याबद्दल पुरावे सादर करणार असल्याचे म्हटले आहे.

Read More
ENTERTAINMENT

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते.

Read More
PUNE

ताल ,मात्रा ,ठेका  मिळून गाणे तयार होते – संगीतकार अशोक पत्की 

नोटेशन म्हणजे मात्राच आहेत. केवळ मुक्तछंदातील शब्द संगीतकारासमोर येऊन चालत नाहीत . तालात शब्द सुचले पाहिजेत. मीटर मध्ये शब्द आले पाहिजेत. ताल ,मात्रा ,ठेका हे सगळे मिळून गाणे तयार होते.हे एकप्रकारचे गणितच असून ते लक्षात घेतले पाहिजे ,’असे प्रतिपादन   संगीतकार अशोक पत्की यांनी केले . 

Read More
PUNE

पुणे विभाग – 2 लाख 34 हजार 421 रुग्ण कोरोना मुक्त; विभागात 3 लाख 15 हजार 860 ऍक्टिव्ह रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभाग –  2 लाख 34 हजार 421 रुग्ण कोरोना मुक्त;
विभागात 3 लाख 15 हजार 860 ऍक्टिव्ह रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

Read More
NATIONALTOP NEWS

देशात 24 तासात विक्रमी 97 हजार 570 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण:1201 जणांचा मृत्यू

शात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा एका दिवसात सर्व विक्रम मोडले आहे. शुक्रवारी तब्बल ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाख ५९ हजारांहून अधिक झाली आहे.

Read More
MAHARASHTRANATIONALTOP NEWS

JEE MAIN चा निकाल जाहीर; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

JEE MAIN चा निकाल जाहीर; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Read More
ENTERTAINMENT

चिरंजीवी चा नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता  चिरंजीवी. उत्तम अभिनय शैली आणि अॅक्शन सीन यांच्या जोरावर चिरंजीवीने अफाट लोकप्रियता मिळविली आहे. विशेष म्हणजे चिरंजीवी त्याच्या कामाच्या बाबतीत प्रयोगशील असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या चित्रपटांमध्ये नव्या अंदाजात किंवा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असतो. यामध्येच त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी एक खास लूक केला आहे. मात्र त्याच्या या लूकमुळे त्या ओळखणं कठीण झाल्याचं दिसून येत आहे.

Read More