Wednesday, June 10, 2026
PUNE

ताल ,मात्रा ,ठेका  मिळून गाणे तयार होते – संगीतकार अशोक पत्की 

पुणे – ‘नोटेशन म्हणजे मात्राच आहेत. केवळ मुक्तछंदातील शब्द संगीतकारासमोर येऊन चालत नाहीत. तालात शब्द सुचले पाहिजेत. मीटर मध्ये शब्द आले पाहिजेत. ताल, मात्रा, ठेका हे सगळे मिळून गाणे तयार होते.हे एकप्रकारचे गणितच असून ते लक्षात घेतले पाहिजे ,’असे प्रतिपादन  संगीतकार अशोक पत्की यांनी केले. 

‘गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या आहेत. गप्पांच्या दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबर रोजी संगीतकार अशोक पत्की यांच्याशी प्राची साठे यांनी  संवाद साधला.  

संगीतकार अशोक पत्की म्हणाले ,’संगीतात आधी चाल देऊन शब्द बसवले जातात .बिट्स ला संगीतात महत्वाची जागा आहे. हे ज्ञान मुळात असले पाहिजे .आवड असली पाहिजे.संगीतातील मात्रांनाही महत्व आहे. काही गाणी ‘बिफोर बिट’ असतात ,काही ‘आफ्टर बीट’ असतात ,काही गाणी समेवर येतात .या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला तर यश मिळते. हे गणित ,वेळेचे गणित पक्के असल्याने पूर्वी ४ तासात गाण्याचे रेकॉर्डिंग होत असे ,आता ४ दिवस लागतात. 

अशोक पत्की पुढे म्हणाले ,’नोटेशन म्हणजे मात्राच आहेत. केवळ मुक्तछंदातील शब्द संगीतकारासमोर येऊन चालत नाहीत . तालात शब्द सुचले पाहिजेत. मीटर मध्ये शब्द आले पाहिजेत. लिहितानाच गाण्याचा  बाज माहित असला पाहिजे. ताल, मात्रा, ठेका हे सगळे मिळून गाणे तयार होते. 

‘गणित केवळ व्यवहारापुरते मर्यादित नाही. संगीतात तर गणिताचे सौंदर्य दिसून येते. वाद्य शिकताना ,चाल लावताना गणिती अभ्यासाचा उपयोग होतो. संगीताच्या माध्यमातून बुद्धीचा गणितीय ठेवा निर्माण करणे शिकणे शक्य आहे, मौखिक परंपरेतून गणिताचा वारसा पुढे नेता येईल. दैनंदिन अध्यापनात याचा समावेश करायला हवा. शिक्षकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा’,असे प्राची साठे यांनी सांगितले.  

‘अंकनाद ‘ अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी या उपक्रमांची आणि ‘गणितालय’ या उपक्रमांची माहिती दिली.’अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं  अॅप   आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ‘ अंकनाद ‘ तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,असे त्यांनी सांगितले. ‘अंक नाद’चे संचालक पराग गाडगीळ यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षक ,विद्यार्थी सहभागी झाले.

निर्मिती नामजोशी यांनी प्रास्ताविक केले.
गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या आहेत.११ ते १३ सप्टेबर दरम्यान सकाळी ११ वाजता वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.११ सप्टेंबर रोजी चारुदत्त आफळे यांनी संवाद साधला. चारुदत्त आफळे यांच्यानंतर या वेबिनारमध्ये १२ सप्टेंबर रोजी संगीतकार अशोक पत्की यांनी मार्गदर्शन केले,१३ सप्टेंबर रोजी तालयोगी सुरेश तळवलकर मार्गदर्शन करणार आहेत.
    
‘ गणित आणि संगीत ‘ हा वेबिनार विनामूल्य असून त्यामध्ये https://zoom.us/meeting/register/tJAsf-ivpjIoHdZkxSLhhWm3K5yKY8Gp9bsU   या लिंक द्वारे सहभागी होता येईल. मिटिंग आय डी  941 8178 9272 हा असून 957366 या पास कोड द्वारे सहभागी होता येईल. 

 या विषयावर पहिला वेबिनार  ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट रोजी झाला. त्यात “अनुभूती रिसर्च अँड फाऊंडेशन चे संस्थापक” प्रसाद मणेरीकर , बालभारती च्या बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर प्राजक्ती गोखले , अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद  चे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे मान्यवर सहभागी झाले. या वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading