Monday, June 15, 2026
PUNE

पुणे विभाग – 2 लाख 34 हजार 421 रुग्ण कोरोना मुक्त; विभागात 3 लाख 15 हजार 860 ऍक्टिव्ह रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि. 12 :- पुणे विभागातील 2 लाख 34 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 15 हजार 860 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 73 हजार 266 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.22 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 15 हजार 975 रुग्णांपैकी 1 लाख 70 हजार 800 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 317 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 858 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 147 रुग्णांपैकी 13 हजार 937 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 611 आहे. कोरोनाबाधित एकूण 599 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 23 हजार 438 रुग्णांपैकी 16 हजार 621 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 909 आहे. कोरोनाबाधित एकूण 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 370 रुग्णांपैकी 11 हजार 622 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 950 आहे. कोरोनाबाधित एकूण 798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 930 रुग्णांपैकी 21 हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 479 आहे. कोरोनाबाधित एकूण 1010 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8 हजार 193 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 750, सातारा जिल्ह्यात 800, सोलापूर जिल्ह्यात 608 , सांगली जिल्ह्यात 936 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1099 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख 20 हजार 261 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 15 हजार 860 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 11 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
***

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading