‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ :कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार प्रभावी मोहीम

कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोनवेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य शिक्षण, संशयित कोविड रूग्ण शोधणे तसेच सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे ‘स्वस्थ महाराष्ट्रासाठी’ लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य मोहीम म्हणजे ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ते २४ ऑक्टोबर अशा दोन फेऱ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Read more

राज्यपालांच्या हस्ते स्मशानभूमी कर्मचारी, स्वच्छता कामगार, भाजी विक्रेते, पोलीसांसह कोविड योद्ध्यांचा सत्कार

कोरोना उद्रेकानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपल्या कार्याच्या माध्यमातून अविश्रांत सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस अधिकारी यांसह जनसामान्य कोविड योद्ध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

Read more

पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा

विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली.

Read more

मराठा समाजाच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई जिंकणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार मागे हटणार नाही. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read more

जनतेला योग्य उपचार देणे आमची सर्वोच्च जबाबदारी : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वोच्च आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. त्यासाठी प्रशासन, पोलीस, आरोग्य, महापालिका या सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक एकछत्री अंमलात जबाबदारीने काम करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.

Read more

स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’

केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय राज्याला स्टार्टअप सुधारणांच्या श्रेणींमध्ये अन्य तीन स्थान मिळाली आहेत.

Read more

राज्यात कोरोना कहर सुरूच; आज सर्वाधिक 24 हजार 886 पॉझिटिव्ह रुग्ण, 393 जणांचा मृत्यू

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Read more

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

Read more

कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम-स्टे सुरू होणार

राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत एसओपी जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळावर जोडपत्र ए, बी आणि सीद्वारे ही कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Read more

संजय राऊत यांना धमक्या देणाऱ्या कंगना समर्थकाला अटक

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकीचा फोन करणाऱ्या एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी कोलकाता मधून अटक केली.

Read more
%d bloggers like this: