Tuesday, September 1, 2026
PUNE

ताल ,लय ,ठेका यामागे गणित : कीर्तनकार चारुदत्त आफळे

पुणे, दि.११- ‘कीर्तीचे गायन म्हणजे कीर्तन ,मनोरंजनाबरोबर प्रबोधन देखील कीर्तन या माध्यमातून केले जाते. ताल ,लय ,ठेका यामागे गणित आहे. आयुष्याचे ,जबाबदारीचेही गणित लक्षात घ्यावे लागते . दिवसाचे गणित मांडावे लागते. ते समजून घेण्यासाठी गणिताचे मानस आपल्याला तयार करावे लागेल,असे प्रतिपादन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
‘गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या आहेत.११ सप्टेंबर रोजी चारुदत्त आफळे यांच्याशी प्राची साठे यांनी संवाद साधला.
चारुदत्त आफळे म्हणाले ,’लहानपणी आईने ‘गाई गाई’ हा पहिला ताल आपल्याला शिकवलेला असतो.अशा लयीतून कीर्तन,संगीत सुरु होते. लोकसंगीतात लय ,ताल ,ठेका आहे .आरती ,कीर्तनातून ते दिसून येते . ताल ,लय ,ठेका यामागे गणित आहे . किर्तन शिकताना शास्त्रीय संगीत ,त्याचे गणित आम्ही संगीत समजून घेतले. गाव आणि साथसंगत करणाऱ्यांच्या सोयीनुसार ताल आणि गणित बदलावे लागते .आयुष्याचे ,जबाबदारीचेही गणित लक्षात घ्यावे लागते. दिवसाचे गणित मांडावे लागते. गणिताचे मानस आपल्याला तयार करावे लागेल. भाषा आणि गणिताचा संबंध आहे . मराठी मात्रांमध्ये देखील गणित आहे. गणित रंजक व्हावे म्हणून लोकसंगीताच्या ठेक्याचा करता येणे शक्य आहे.

‘वाद्य शिकताना ,चाल लावताना गणिती अभ्यासाचा उपयोग होतो. संगीताच्या माध्यमातून बुद्धीचा गणितीय ठेवा निर्माण करणे शिकणे शक्य आहे, दैनंदिन अध्यापनात याचा समावेश करायला हवा. शिक्षकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा’,असे प्राची साठे यांनी सांगितले .
‘गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या आहेत.११ ते १३ सप्टेबर दरम्यान सकाळी ११ वाजता वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.११ सप्टेंबर रोजी चारुदत्त आफळे यांनी संवाद साधला. चारुदत्त आफळे यांच्यानंतर या वेबिनारमध्ये १२ सप्टेंबर रोजी संगीतकार अशोक पत्की,१३ सप्टेंबर रोजी तालयोगी सुरेश तळवलकर मार्गदर्शन करणार आहेत
‘अंकनाद ‘ अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली.’अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं अॅप आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ‘ अंकनाद ‘ तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,असे त्यांनी सांगितले. ‘अंक नाद’चे संचालक पराग गाडगीळ यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षक ,विद्यार्थी सहभागी झाले. निर्मिती नामजोशी यांनी प्रास्ताविक केले.
‘ गणित आणि संगीत ‘ हा वेबिनार विनामूल्य असून त्यामध्ये https://zoom.us/meeting/register/tJAsf-ivpjIoHdZkxSLhhWm3K5yKY8Gp9bsU या लिंक द्वारे सहभागी होता येईल. मिटिंग आय डी 941 8178 9272 हा असून 957366 या पास कोड द्वारे सहभागी होता येईल.
या विषयावर पहिला वेबिनार ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट रोजी झाला. त्यात “अनुभूती रिसर्च अँड फाऊंडेशन चे संस्थापक” प्रसाद मणेरीकर , बालभारती च्या बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर प्राजक्ती गोखले , अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद चे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे मान्यवर सहभागी झाले. या वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अंकनाद अॅपविषयी
दोन ते तीसचे पाढे घोकून पाठ करणं हे विद्यार्थ्यांना करावं लागतंच. पण या नव्या पिढीला पावकी, निमकी, पाऊणकी हे शब्दच माहीत नाहीत. ही कोष्टकं म्हणजेच अपूर्णांकांचे पाढे पाठ केले, तर गणिताचा पाया पक्का होऊन जातो. ‘अंकनाद’ मध्ये पाढ्यांबरोबरच ही कोष्टकंसुद्धा साध्या सोप्या पद्धतीने शिकवली जातात.
गणित या विषयाची मुलांना एका नव्या, आकर्षक रुपात ओळख करून द्यावी आणि अवघड वाटणाऱ्या या विषयाशी सहजसोप्या रीतीने मैत्री व्हावी या उद्देशाने ‘अंकनाद’ ऍपची निर्मिती झाली. अल्पावधीतच मुलं आणि त्यांचे पालक यांनी या ऍपला भरघोस प्रतिसाद दिला.
विविध उपक्रम आणि कार्यशाळा यांच्या मार्फत विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी सतत काही नवीन देता यावे हाच अंकनादचा प्रयत्न आहे.
https://bit.ly/2Po2CI4 या लिंकवर जाऊन अॅप डाउनलोड करता येईल …………………………………………
(Media co ordination : Prabodhan Madhyam- News Agency. *Deepak Bidkar* 9850583518 *Gauri Bidkar .)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading