Wednesday, June 10, 2026
PUNE

पुणे विभाग- 2 लाख 27 हजार 117 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 3 लाख 7 हजार 667 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि. 11 :- पुणे विभागातील 2 लाख 27 हजार 117 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 7 हजार 667  आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 72 हजार 563  आहे. कोरोनाबाधीत 7 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.82 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 11 हजार 225 रुग्णांपैकी 1 लाख 66 हजार274 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 181 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.26 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 78.72 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 347 रुग्णांपैकी 13 हजार 82 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 683 आहे. कोरोनाबाधित एकूण 582 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 830 रुग्णांपैकी 16 हजार 275 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 667 आहे. कोरोनाबाधित एकूण 888 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 434 रुग्णांपैकी 10 हजार 747 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 925 आहे. कोरोनाबाधित एकूण 762 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 831 रुग्णांपैकी 20 हजार 739 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 107 आहे. कोरोनाबाधित एकूण 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8 हजार 270 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 935, सातारा जिल्ह्यात 817, सोलापूर जिल्ह्यात 697 , सांगली जिल्ह्यात 1 हजार 174 तर कोल्हापूर जिल्ह्यात 647 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 95 हजार 482 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 7 हजार 667 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 10 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading