fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRATOP NEWS

राज्यात कोरोना कहर सुरूच; आज सर्वाधिक 24 हजार 886 पॉझिटिव्ह रुग्ण, 393 जणांचा मृत्यू

पुण्यात दिवसभरात 1938 नवीन पॉझिटिव्ह

मुंबई, दि. 11-देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

बरे होण्याचे प्रमाण ७०.४ टक्के

गेल्या २४ तासात राज्यात २४ हजार ८८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज १४ हजार ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १५ हजार ०२३ जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे झाले आहे.

मृत्यूदर २.८३ टक्के

सध्या राज्यातील मृत्यूदर २.८३ टक्के एवढा झाला आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५० लाख ७२ हजार ५२१ नमुन्यांपैकी १० लाख १५ हजार ६८१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १६ लाख ४७ हजार ७४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३८ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे ११ सप्टेंबर
…….
– दिवसभरात १९३८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १५७३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ५९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ९१७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४७० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ११५७७०.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७०३९.
– एकूण मृत्यू -२७०६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ९६०२५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६५८८.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading