Tuesday, June 9, 2026
Latest NewsSports

पीटीसीए क्रिकेट ॲकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे :  ट्वेन्टीफोर स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट आणि क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) ॲकॅडमी यांच्यावतीने आयोजित ‘सीएसआर विंटर करंडक‌’ आंतरक्लब १४ वर्षाखालील गटाच्या एकदिवसीय (४५-४५ षटके) क्रिकेट स्पर्धेत समर्थ पोकळे याने केलेल्या ७७ धावांच्या जोरावर पीटीसीए क्रिकेट ॲकॅडमीने व्हिडीआर क्रिकेट ॲकॅडमीचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हीडीआर क्रिकेट ॲकॅडमीने ४१.४ षटकात १३३ धावांचे लक्ष्य उभे केले. आशितोष कुमार (३१ धावा) आणि जय मोहीते (२६ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. पीटीसीएकडून आरव नन्ना याने तीन गडी तर, वैंकटेश तडवलकर याने दोन गडी बाद केले. हे लक्ष्य पीटीसीए क्रिकेट ॲकॅडमीने १५.५ षटकात व २ गडी गमावून सहज पूर्ण केले. समर्थ पोकळे याने ४८ चेंडूमध्ये १० चौकार आणि ४ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. प्रिन्स खांडेकर याने नाबाद ३९ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ५० चेंडूत ७४ धावांची भागिदारी रचून संघाचा विजय सोपा केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ट्वेन्टीफोर स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट आणि क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) ॲकॅडमीचे संचालक उदय म्हात्रे, अंबी एलाईट कंपनीच्या संचालिका हर्षिता अंबीलकर, उद्योगपती अमित दांगट आणि साई गणेश फ्लेक्स्‌ प्रिंटींगचे महेश इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या पीटीसीए क्रिकेट ॲकॅडमी आणि उपविजेत्या व्हिडीआर क्रिकेट ॲकॅडमी या संघांना करंडक आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
व्हीडीआर क्रिकेट ॲकॅडमीः ४१.४ षटकात १० गडी बाद १३३ धावा (आशितोष कुमार ३१, जय मोहीते २६, आरव नन्ना ३-२१, वैंकटेश तडवलकर २-२०) पराभूत वि. पीटीसीए क्रिकेट ॲकॅडमीः १५.५ षटकात २ गडी बाद १३८ धावा (समर्थ पोकळे ७७ (४८, १० चौकार, ४ षटकार), प्रिन्स खांडेकर नाबाद ३९, जय मोहीते १-१४); (भागिदारीः दुसऱ्या गड्यासाठी समर्थ आणि प्रिन्स्‌ यांच्यात ७४ (५०); सामनावीरः समर्थ पोकळे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading