Monday, June 15, 2026
MAHARASHTRA

संजय राऊत यांना धमक्या देणाऱ्या कंगना समर्थकाला अटक

मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकीचा फोन करणाऱ्या एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी कोलकाता मधून अटक केली. शहरातील टॉलीगंगे भागातून पलाश बोस नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. त्याला आज अलिपूर कोर्टात हजर केले जाईल. आरोपीवर राऊत यांना इंटरनेट कॉलिंग केल्याचा आरोप केला जात होता.

टॉलीगंगे येथील रहिवासी पलाश बोस याला काल रात्री पोलिसांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या आरोपाखाली अटक केलं आहे. पलाश हा कंगना रनौत  चा समर्थक आहे आणि म्हणूनच कॉल केल्याचे सांगितले जात आहे. आज दुपारी 1 वाजता अलिपूर कोर्टात त्याला हजर करण्यात येणार होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. देशाबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचे समजते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading