चिरंजीवी चा नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी. उत्तम अभिनय शैली आणि अॅक्शन सीन यांच्या जोरावर चिरंजीवीने अफाट लोकप्रियता मिळविली आहे. विशेष म्हणजे चिरंजीवी त्याच्या कामाच्या बाबतीत प्रयोगशील असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या चित्रपटांमध्ये नव्या अंदाजात किंवा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असतो. यामध्येच त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी एक खास लूक केला आहे. मात्र त्याच्या या लूकमुळे त्या ओळखणं कठीण झाल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या चिरंजीवीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क टक्कल केल्याचं दिसून येत आहे. या फोटोला त्याने साजेशी कॅप्शन दिल्याचं दिसून येत आहे. ‘#UrbanMonk, मी खरंच सन्यासी असल्यासारखा विचार करु शकेन का? , असं तो म्हणाला आहे.चिरंजीवीचा हा नवा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चिरंजीवीचा नवा लूक पाहून चाहते हैराण झाल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांचादेखील समावेश आहे.. राम चरण, वरूण तेज, नागा बाबू, कल्याण देव या सेलिब्रिटींनी देखील चिरंजीवीच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.
