Thursday, June 18, 2026
MAHARASHTRANATIONALTOP NEWS

JEE MAIN चा निकाल जाहीर; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

मुंबई – आयआयटी तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. विद्यार्थी व पालकांना उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर पाहायला मिळेल. शुक्रवारी निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी आणि पालक दिवसभर एनटीए जेईई मेन्सची वेबसाइटवर पाहत होते. मात्र, दिवसभर निकाल जाहीर न होता रात्री अकराच्या सुमारास जाहीर झाला.

गुजरातचा निसर्ग चढ्ढा देशात प्रथम आला असून, राज्यात प्रथम येण्याचा मान स्वयम् शशांक चौबे याला मिळाला आहे. चौबेचा राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक आहे. १०० पर्सेंटाइल मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांत तेलंगणमधील सर्वाधिक सात विद्यार्थी आहेत.

जेईई मेन्स परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात पार पडली होती. देशातील साधारण ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती तर त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. गेल्या वर्षी जानेवारी आणि एप्रिल परीक्षेला अनुक्रमे ९४.११ आणि ९४.१५ टक्के उपस्थिती होती.

असा बघता येणार निकाल…

जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.
View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.
अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
सिक्युरिटी पिन नंबर टाका
लॉग इन करा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading