राज्यात आज 22 हजार 84 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
पुण्यात दिवसभरात 1909 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
मुंबई, दि. 12 – मागील 24 तासांत राज्यात 22,084 नवे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 37 हजार 765 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यात 13,489 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडा 7 लाख 28 हजार 512 वर पोहोचला आहे. राज्यात मागील 24 तासांत 391 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात सद्य घडीला 2 लाख 79 हजार 768 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.2% इतके झाले आहे. तर मृत्यूदर 2.81% इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 51 लाख 64 हजार 840 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातील 10 लाख 37 हजार 765 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्य स्थितीत राज्यात 16,52,955 रुग्ण हे होम क्वारंटाईन असून 38,275 रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. Coronavirus in Pune: कोरोना विषाणू संकटात लग्न करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाचा नवा नियम; पोलिसांकडे सादर करावे लागणार लग्नाचे Video Recording
देशात 46,59,985 वर कोरोना बाधितांचा आकडा आता देशात झाला आहे. तर 9,58,316 अॅक्टिव्ह रुग्ण संख्या असून 36,24,197 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 77,471 जणांचा बळी गेला आहे.
पुणे शहर ..!
………
- दिवसभरात 1909 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 1464 रुग्णांना डिस्चार्ज.
- 42 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 117679
- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 17442
- एकूण मृत्यू – 2748
- एकूण डिस्चार्ज- 97489
