fbpx
Friday, April 26, 2024
MAHARASHTRATOP NEWS

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ.नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि. 8 – – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस. आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुनर्नियुक्ती झाली. या निवडणुकीपूर्वी भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने निवडणुकीत रंगत वाढली होती, मात्र आपल्याला न्यायालयाने बोलावले नसल्याचे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर एकमताने नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. दरम्यान, उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपाने सभात्याग केला.

विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी भाजपाकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र विरोधकांच्या सभात्यागामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणुकीपूर्वी भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबतचा निकाल न्यायालय गुरुवारी देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. तसेच या ठिकाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले. यानंतर आवाजी मतदान घेण्यात आले आणि नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading