विधानपरिषदेत सत्ताधारी अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत विरोधात आक्रमक
मुंबई, दि. ८ – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांच्या विरोधात एक्रेरी उल्लेख करून महाराष्ट्राचा ही अपमान करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात आज विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाकडून हक्क भंग प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे भाई जगताप यांनी अर्णव आणि कंगना हिच्या विरोधात तर शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हा प्रस्ताव मांडत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आक्रमक भूमिका मांडली.
यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सध्या विधानपरिषद हक्कभंग समिती कार्यरत नाही, मात्र विषय गंभीर असल्याने हा प्रस्ताव मी स्वीकारत असू. पुढे त्यावर काय करायचे याचा निर्णय घेईन असे आश्वासन दिलं
नियम २४० अन्वये काँग्रेचे सदस्य भाई जगताप यांनी
अर्णव गोस्वामी, कंगना यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सभापती कडे सादर केला होता.
दरम्यान, विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी आक्षेप घेत हा हककभंग कसा होतो, असा सवाल केला, त्यावर सभापतींनी आपण हा प्रस्ताव माझ्याकडे आल्याने मी त्यांना बोलायचे संधी देत असल्याचे सांगितलं.
विधानकार्य मंत्री कामकाज मंत्री अनिल परब यांनी
संविधानाच्या चौकट कोणालाही मोडता येत नाही पण अर्णव हे स्वतः नयायधिश झाल्यासारखे वागत आहेत, ते संसदीय लोकशाहीची चौकट मोडीत काढत आहेत.यामुळे यापूर्वी सभागृहाने अनेक माजलेल्या पत्रकारांना ताळ्यावर आणले आहे, तसे अर्णव यालाही ताळ्यावर आणावं अशी मागणी केली.
