Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

इसुझू मोटर्स इंडिया’च्या वतीने देशभरात ‘इसुझू आय-केअर प्री-मान्सून सर्व्हिस कॅम्प’च्या आयोजनाची घोषणा

पुणे: सर्वोत्तम सेवा तसेच मालकीचा अनुभव देण्याच्या इसुझू’च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नात, इसुझू मोटर्स इंडिया आपल्या इसुझू डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हीच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझू आय-केअर प्री-मान्सून कॅम्प’ आयोजित करणार आहे. या सेवा शिबिराचा उद्देश ग्राहकांना देशभरात सर्व मोसमात त्रास-मुक्त वाहन चालविण्याच्या अनुभवासाठी रोमांचक लाभ तसेच प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी उपलब्ध करून देणे हा आहे.‘इसुझू केअर’च्या पुढाकाराने, दिनांक 18 ते 24 जून 2026 (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान सर्व इसूझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर मान्सूनपूर्व शिबिराचे आयोजन केले जाईल. या कालावधीत, ग्राहक त्यांच्या वाहनांसाठी विशेष ऑफर आणि लाभ देखील मिळवू शकतात.

शिबिराला भेट देणाऱ्या ग्राहकांना अनेक आकर्षक लाभांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मोफत 37-पॉइंट सर्वसमावेशक वाहन तपासणी, मजुरीवर 10% सवलत, सुट्ट्या भागांवर 5% सवलत तसेच ल्यूब्रिकंट्स आणि फ्ल्यूइड्सवर 5% सवलत यांचा समावेश आहे. याशिवाय, रिटेल रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) वर 20% सवलत, प्रोकेअरवर 5% सवलत आणि विस्तारित वॉरंटीवर 20% सवलत देण्यात येणार आहे. सर्व ऑफर्सवर नियम व अटी लागू असून त्या केवळ बीएस6 वाहनांसाठी वैध आहेत. प्रोकेअरवरील सवलत फक्त बीएस6 एस-कॅब, एस-कॅब झेड आणि डी-मॅक्स रेग्युलर कॅब मॉडेल्ससाठी लागू आहे. विस्तारित वॉरंटीवरील सवलत 1 ऑक्टोबर 2025 नंतर खरेदी करण्यात आलेल्या बीएस6 एस-कॅब, एस-कॅब झेड आणि डी-मॅक्स रेग्युलर कॅब मॉडेल्ससाठीच उपलब्ध असून ही ऑफर 24 जून 2026 पर्यंत वैध राहील.

आग्रा, अहिल्यानगर, अहमदाबाद, अंबिकापूर, बारामुल्ला, बरेली, बारमेर, भरूच, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिकानेर, बिलासपूर, कालिकत, छत्रपती संभाजी नगर, चेन्नई, चिकमंगळुरू, कोईमबतूर, धुळे, दिल्ली, दिब्रूगड, दिमापूर, दुर्गापूर, एर्नाकुलम, गांधीधाम, गोरखपूर, गुरूग्राम, गुवाहाटी, हावडा, हुबळी, हैदराबाद, इंदूर (2), जगदलपूर, जयगाव, जयपूर, जालंधर, जम्मू, जोधपूर, कडप्पा, कलबुर्गी, कर्नाल, कायमकुलम, खम्मम, कोल्हापूर, कोलकाता, कोट्टायम, कुर्नूल, लातूर, एलबी नगर (हैदराबाद) लेह, लखनऊ, लुधियाना, मदुराई, मंडी, मंगळुरू, मेहसाणा, मोहाली, मुंबई (नेरूळ) मुंद्रा, म्हैसूर, नागपूर, नामक्कल, नाशिक, नेल्लोर, निजामाबाद, नोएडा, ओंगोल, पाटणा, पुणे, रायपूर, राजमुंद्री, राजकोट, रत्नागिरी, सातारा, शिवमोगा, सीकर, सिलीगुडी, सोलापूर, सुरत, थेनी, त्रिशूर, तिरुनेलवेली, तिरुपती, त्रिची, तिरुवनंतपुरम, वडोदरा, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि यवतमाळ येथील इसुझूच्या सर्व अधिकृत सेवा सुविधाकेंद्रांत प्री-मान्सून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राहकांना नजीकच्या इसुझू विक्रेता दालनात संपर्क साधता येईल किंवा ते सर्व्हिस बुकिंगकरिता https://isuzu.in/servicebooking ला भेट देऊ शकतात. अधिक माहितीसाठी ग्राहक 1800 4199 188 (टोल फ्री) वर संपर्क साधू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading