रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक
मुंबई, दि. 8 – सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीच्या पथकानं मंगळवारी अटक केली आहे. आज काही तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंह प्रकरणामध्ये ड्रग्स अँगलच्या खुलाशानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा हे सध्या एनसीबीच्या 4 दिवसांच्या कोठडीत आहेत.
रियाच्या डिव्हाइसमध्ये ड्रग्ससंबंधित अनेक फोटो मिळाले आहेत. आता एनसीबी बॉलिवूडमधील तब्बल 25 जणांना समन्स पाठविणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये ड्रग्स अॅगल आल्यापासून अनेकजण गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, एनसीबी 25 जणांना चौकशीसाठी समन्स पाठविण्याच्या तयारीत असल्यानं अनेक दिग्गजांचे धाब दणाणले आहेत.
