fbpx
Saturday, April 27, 2024
ENTERTAINMENTTOP NEWS

रिया चक्रवर्तीने एनसीबीच्या चौकशीत घेतली बड्या स्टार्सची नावं

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अंमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक करण्यात आलेला आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्टाला सांगितले. दीपेशने दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने रियाकडे चौकशी सुरू केली.

तब्बल सहा तासांहून अधिक वेळ रियाची चौकशी झाली. या चौकशीदरम्यान रियाने बॉलिवूडमधल्या काही बड्या कलाकारांची नावे एनसीबीसमोर उघड केली. ही कोणकोणती नावे आहेत आणि कशासंदर्भात तिने ती नावे सांगितली, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये अमली पदार्थांची चव कधीच चाखलेली नाही, असा दावा केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading