अमारा पार्टनर्सच्या ₹600 कोटी बेस फंडला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद
मुंबई : अँकर गुंतवणूकदार आनंद महिंद्रा यांच्या पाठबळाने स्थापन झालेल्या अमारा पार्टनर्स या मिड-मार्केट प्रायव्हेट इक्विटी फंडाने जाहीर केले आहे की त्यांच्या ₹600 कोटी बेस फंडला अपेक्षेपेक्षा जास्त गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे भारतातील पुढील पिढीतील मिड-मार्केट चॅम्पियन्सना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या रणनीतीवर गुंतवणूकदारांचा दृढ विश्वास अधोरेखित होतो. या फंडात भारतातील अनेक प्रतिष्ठित मोठ्या संस्थात्मक कुटुंबीयांनी सहभाग नोंदवला आहे. आता अमारा पार्टनर्स ₹200 कोटींपर्यंतच्या ग्रीन शू ऑप्शनचा वापर करत आहे. या ग्रीन शू पर्यायाच्या अंतर्गत अमारा लीडरशिप सर्कल सुरू करण्यात आले आहे, जे एक विशेष गुंतवणूकदार गट आहे. यामध्ये भारतातील आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांतील सीईओ आणि वरिष्ठ नेतृत्व पातळीवरील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. हा निधी भारताच्या आर्थिक वाढीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्पादन, आरोग्यसेवा, वित्तीय सेवा आणि ग्राहक क्षेत्रांतील मध्यम आकाराच्या, प्रवर्तक-आधारित व्यवसायांना पाठिंबा देणार आहे. अमारा पार्टनर्स $10 ते $15 दशलक्ष इतक्या तिकीट साइजद्वारे 10 ते 12 गुंतवणुका करण्याची योजना आखत आहे, तसेच सह-गुंतवणुकीसाठी $20 दशलक्षपर्यंतची क्षमता उपलब्ध असेल. अमारा पार्टनर्सने याआधीच ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज आणि एनबीएफसी फाईब या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, जी उच्च क्षमतेच्या आणि प्रवर्तक-आधारित कंपन्यांना वाढवण्याच्या त्यांच्या धोरणांचे प्रतिक आहे. या विकासावर प्रतिक्रिया देताना अमारा पार्टनर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार पराग शाह म्हणाले, “आमच्या बेस फंडला मिळालेला जोरदार प्रतिसाद आणि ओव्हरसब्स्क्रिप्शनमुळे आम्ही अत्यंत आनंदित आहोत. भारतातील अनेक मध्यम आकाराच्या, प्रवर्तक चालित व्यवसायांसाठी भांडवलात मोठी कमतरता आहे, जे जागतिक स्तरावर भारताच्या क्षमतांना पुढे नेण्याची दृष्टी आणि क्षमता ठेवतात. अमारा पार्टनर्स प्रायव्हेट इक्विटीमध्ये कॉर्पोरेट मानसिकता घेऊन येत आहे, या कंपन्यांचे संस्थात्मक रूपांतर करून त्यांचा विस्तार करण्यावर, टॅलेंट आकर्षित करण्यावर आणि M&A (विलीनीकरण व अधिग्रहण) संधी साधण्यावर आमचा भर आहे.” अमारा पार्टनर्सच्या संस्थापक टीममध्ये पराग शाह आणि पियुष सोनी यांचा समावेश आहे, ज्यांना बाजारातील विविध चक्रांमधील आणि गुंतवणुकीच्या विविध टप्प्यांमधील एकूण चार दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे. दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोन, उत्कृष्ट ऑपरेशनल अंमलबजावणी आणि मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्स या तत्वांवर त्यांची भक्कम पकड आहे. या टीमने याआधी महिंद्रा पार्टनर्स मध्ये एकत्र काम केले आहे, जिथे त्यांनी $500 दशलक्ष पेक्षा जास्त भांडवल गुंतवले आणि $1.5 अब्ज पेक्षा जास्त परतावा दिला आहे. अमारा पार्टनर्स मूल्यनिर्मितीसाठी थेट सहभाग घेतो. प्रवर्तकांना आणि संस्थापकांना रणनीतिक भांडवल, ऑपरेशनल तज्ज्ञता, M&A सल्ला, योग्य प्रतिभा शोधणे आणि शेजारील बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी सक्रीय पाठिंबा दिला जातो. अमाराची खासियत म्हणजे भारतातील अनुभवी व्यावसायिक थेट कंपन्यांमध्ये सहभागी करून ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि दीर्घकालीन वाढीचा पाया भक्कम करणे. या संस्थेला भारतातील काही अत्यंत मान्यवर उद्योग नेत्यांच्या सल्लागार मंडळाचे मार्गदर्शन लाभते. यामध्ये आनंद महिंद्रा, हायग्रिव खैतान, एम. एम. मुरुगप्पन आणि रफिक मलिक यांचा समावेश आहे.
Read More