रिअल इस्टेटची पुनर्कल्पना: 3D प्रिंटिंगमुळे भारतातील घरांचा कायापालट
शहरीकरण वेगाने वाढते आहे. घर खरेदी करणाऱ्यांच्या स्वतःच्या काही कल्पना असतात. त्याप्रमाणे त्यांना आपल्या घराची रचना अनोखी आणि टिकाऊपणा हवा असतो. तसेच आपल्या स्वप्नातील घर वेगाने पूर्ण व्हावे अशीही इच्छा असते. बदलत्या काळानुसार आता बांधकाम क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी एक शक्तिशाली, अचूक आणि वाढत्या प्रमाणात सिद्ध झालेले तंत्रज्ञान आहे: 3D प्रिंटिंग. एकेकाळी प्रायोगिक म्हणून पाहिले जाणारे, 3D प्रिंटिंग किंवा ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हे जागतिक स्तरावर आणि भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातही वेगाने लोकप्रिय होत आहे. पारंपरिक बांधकाम पद्धतींपेक्षा वेगळे हे 3D प्रिंटिंग म्हणजे आधीच प्रोग्रॅमिंग केलेले डिझाइन आहे. जे सक्षमपणे आणि नजाकतीने तयार साहित्याचा वापर करून घराची रचना करते. परिणामी, या प्रक्रियेत वेळ कमी लागतो. साहित्याचा वापरही कमी होतो आणि आपल्या घराच्या रचनेचे स्वातंत्र्यही मिळते. ब्लूप्रिंट ते काही दिवसांत घर उभारणीपर्यंत 3D प्रिंटिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वेग. पारंपरिक बांधकामात ज्या
Read More