Sunday, May 24, 2026
Latest NewsPUNE

खडकवासला काँग्रेस तर्फे हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

 

पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने धायरेश्वर मंदिराजवळील टेकडीवर वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. हरित पर्यावरणाचा संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सपकाळ साहेबांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करून वृक्षारोपणाचा संकल्प घेण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण पाटील सांगितले की, “हर्षवर्धनजी सपकाळ हे युवकांच्या मनातील खरे नेते असून त्यांनी सदैव जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाला नवीन बळ मिळत आहे.पर्यावरण संवर्धनासारख्या उपक्रमांमधून समाजात जनजागृती निर्माण करणे ही खरी काळाची गरज आहे.”
या कार्यक्रमात विविध प्रकारच्या छायादार, फळझाडे व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे.या उपक्रमामुळे धायरेश्वर टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलणार असून परिसर हरित व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.
शेवटी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी “स्वच्छ व हरित खडकवासला”चा नारा देत वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.

या प्रसंगी उपस्थित पुणे शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष धनंजय पाटील, किसान काँग्रेस अध्यक्ष शंकरराव दांगट, लोकसभा उपाध्यक्ष सुरेश मते, युवक अध्यक्ष विश्वजित जाधव, हवेली तालुका अध्यक्ष रघुनाथ यादव, साहेबराव मते, माजी उपसरपंच गुलाबअण्णा पोकळे, नामदेवराव भुरुक, देवराज यादव, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading