Friday, October 30, 2026
BusinessLatest News

उबरकडून भारतातील आपल्या २० लाखांहून अधिक ड्रायव्हर्ससाठी नवीन वैशिष्ट्ये लाँच

पुणे : उबरने आज उबर प्रगतीच्या तिसऱ्या एडिशनमध्ये ड्रायव्हर्सना प्राधान्य देणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची घोषणा केली. या उपक्रमांचा उद्देश आपल्या प्लॅटफॉर्मवर कमाई करणे अधिक सोपे, सुरक्षित आणि फायदेशीर बनवणे हा आहे. यामध्ये कमाईचे अधिक लवचिक पर्याय, उत्पन्नाच्या नवीन संधी आणि ड्रायव्हिंग करताना अधिक प्रबळ सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. उबरने आपल्या अतुलनीय सुरक्षा तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभावही अधोरेखित केला, ज्यामध्ये आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका साहाय्य आणि अॅपमधील एन्क्रिप्टेड व्हिडिओ रेकॉर्डिंगचा समावेश आहे, ज्याने वादग्रस्त घटनांमध्ये वस्तुस्थिती स्पष्ट करण्यास मदत केली आहे.

उबर इंडिया व साऊथ एशियाचे सप्लाय ऑपरेशन्सचे डायरेक्टर आदित्य कपूर म्हणाले, “भारतामध्ये लवचिक कमाईच्या संधींसाठी पसंतीचा प्लॅटफॉर्म राहणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ ड्रायव्हर्सना त्यांच्या स्वतःच्या अटींवर काम करण्याचे स्वातंत्र्य, उद्योगात आघाडीवर असलेल्या सुरक्षेचा विश्वास आणि कमाईचे अधिक मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे. आम्हाला ड्रायव्हर्सनी प्लॅटफॉर्मकडून नेमक्या काय अपेक्षा ठेवाव्यात, याचे नवे मापदंड सातत्याने प्रस्थापित करायचे आहेत.”

ड्रायव्हर्सच्या अभिप्रायावर आधारित प्रमुख सुधारणा:

अधिक सोपे: अधिक लवचिकता, कमी त्रास

फ्लेक्सिबल ड्राईव्ह पास | उद्योगात सर्वप्रथम

अर्धवेळ (पार्ट-टाइम) आणि पूर्णवेळ (फुल-टाइम) अशा दोन्ही प्रकारच्या ड्रायव्हर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उबर केवळ ६ तासांपासून ते १८० दिवसांपर्यंत मुदतीचे सबस्क्रिप्शन पासेस उपलब्ध करून देत जास्तीत-जास्त पर्याय देते.

क्विकस्टार्ट | राईड-हेलिंग क्षेत्रात सर्वप्रथम

ड्रायव्हर्स आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सहजरित्या उबरशी जोडू शकतात, ते रोज वापरत असलेल्या चॅट अॅपद्वारे ऑनबोर्डिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे.

इतर प्लॅटफॉर्म्सवरील आधी पैसे भरा पद्धतीपेक्षा वेगळी ‘अर्न फर्स्ट, पे लेटर‘ सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत खात्यातील शिल्लक संपली तरीही पात्र ड्रायव्हर्सना अतिरिक्त क्रेडिट मर्यादेत रोख ट्रिप्स स्वीकारणे सुरू ठेवता येईल, ज्यामुळे त्यांच्या कामाच्या दिवसात खंड पडणार नाही. मजकुरापेक्षा ऑडिओच्या प्राधान्यामुळे उबर ड्रायव्हर्स आता अॅपमधील चॅटमध्ये व्हॉईस नोट्सद्वारे प्रवाशांशी संवाद साधू शकतात. हे सर्व नवीन सुलभ ड्रायव्हर अॅप वापरून शक्य होईल, जे कमाई, ट्रिपचा तपशील आणि महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.

अधिक सुरक्षित: नाविन्यतेपासून प्रत्यक्ष प्रभावापर्यंत

रुग्णवाहिका साहाय्य | राईड-हेलिंग क्षेत्रात सर्वप्रथम

डायल ४२४२ सोबत सहयोगाने उबरच्या २४x७ सुरक्षा हेल्पलाईनद्वारे आता रुग्णवाहिका साहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या चार महिन्यांत २५ प्रसंगी ही सेवा तातडीने पुरवण्यात आली, ज्यामुळे अपघातानंतर प्रवासी आणि ड्रायव्हर्सना वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले.

रेकॉर्ड माय राईड | उद्योगात सर्वप्रथम

हे एन्क्रिप्टेड व्हिडिओ रेकॉर्डिंग वैशिष्ट्य राईडदरम्यान नेमके काय घडले यावरील संभ्रम दूर करते. प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्यातील वादग्रस्त घटनेचे निवारण करण्यासाठी याचा आधीच उपयोग झाला आहे, तसेच वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात या रेकॉर्डिंगने पोलिसांना मोलाची मदत केली आहे.

सेफ्टी कंटेंट फ्लॅग

उबर रिअल-टाइम चॅट संरक्षण यंत्रणा सादर करत आहे, जी संभाव्य अयोग्य भाषेची ओळख पटवून प्रवाशांना मेसेज पाठवण्यापूर्वी पुनर्विचार करण्यास सुचवते. अशा प्रकारचे अयोग्य मेसेज येणाऱ्या ड्रायव्हर्सना त्यांचे रद्दीकरण प्रमाण बाधित न होता अशा ट्रिप्स रद्द करण्याची सुविधा मिळते.

तसेच, अॅपमधील ड्रायव्हर सेफ्टी हब सुरक्षेची सर्व साधने आणि मदत एकाच छताखाली उपलब्ध करून देते, ज्यामुळे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि ट्रिप-शेअरिंग यांसारखी निवडक सुरक्षा वैशिष्ट्ये आपोआप सक्रिय ठेवणे ड्रायव्हर्सना शक्य होते.

अधिक फायदेशीर: कमाईच्या संधींचा विस्तार

बाईक ड्रायव्हर्ससाठी कमाईचे अधिक पर्याय

उबर पारंपरिक बाईक ट्रिप्सच्या पलीकडे जाऊन कमाईच्या संधी वाढवत आहे. बाईक इंटरसिटीमुळे दिल्ली-मेरठ यांसारख्या लगतच्या शहरांदरम्यान कमी अंतराचा प्रवास शक्य झाला आहे. उबर डायरेक्टच्या साहाय्याने बाईक ड्रायव्हर्स व्यावसायिक कंपन्यांच्या डिलिव्हरी ऑर्डर्स पूर्ण करू शकतात, तर उबर पार्सलमुळे त्यांना शहरांतर्गत वैयक्तिक पार्सल पोहोचवणे शक्य होते.

उबर पेटमुळे सहभागी कार ड्रायव्हर्ससाठी कमाईची आणखी एक नवीन संधी निर्माण झाली आहे. ते पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करू शकतात. तसेच उबरचा रेफर अँड अर्न उपक्रम नवीन ड्रायव्हर्सना प्लॅटफॉर्मवर आणणाऱ्या विद्यमान ड्रायव्हर्सना आकर्षक रिवॉर्ड्स देखील देतो.

 

Leave a Reply