Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

लक्ष्मी व कुमठेकर रस्त्यावर विद्युत रोषणाईचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याहस्ते उद्घाटन

पुणे  : पुण्याच्या पारंपरिक बाजारपेठांना वेगळी ओळख देणाऱ्या लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन गुरुवारी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेलट्रेड गारमेंट असोसिएशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात ही रोषणाई करण्यात आली आहे.दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 यावेळी बोलताना नवल किशोर राम म्हणाले, “पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. पारंपरिक बाजारपेठांचे महत्त्व आजही कायम आहे.युरोपसारख्या ठिकाणीही लोकांना केवळ मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा शहरातील गल्ल्यांमधून फिरणे, तेथील सुंदर ठिकाणे अनुभवणे, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे आणि चांगल्यादुकानांमधून खरेदी करणे अधिक आवडते. पुण्यातही अशा प्रकारच्या संस्कृतीला मोठा वाव आहे. पुणे अशा अनुभवांसाठी अनुकूल वातावरण देणारे शहर आहे.”

पुण्यात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे दिवाळीलाही विशेष महत्त्व आहे. या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी व्यापारी संघटनांनी एकत्र येत केलेली रोषणाई शहराच्या उत्सवी वातावरणात भर घालत आहे. व्यापारी संघटनांचे योगदान केवळ अशा उपक्रमांपुरते मर्यादित नसून, शहरावर संकट आले किंवा मदतीची गरजनिर्माण झाली, तरी व्यापारी नेहमीच उत्स्फूर्तपणे सहकार्य करतात, असेही यावेळी नवल किशोर राम म्हणाले .

 युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशनचे सचिव मिलिंद शालगर म्हणाले, “पुण्याला सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. या परंपरेच्या जतनात व्यापारीही उत्साहाने सहभागी होतात. दिवाळीनिमित्त बाजारपेठांमधील उत्साह अधिकवाढावा आणि नागरिकांना खरेदीचा आनंददायी अनुभव मिळावा, या उद्देशानेव्यापाऱ्यांनी एकत्र येऊन दरवर्षी विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारच्या उपक्रमाची सुरुवात करण्याचा मान पुण्याला मिळाला असून, आता इतर शहरांमध्येही त्याचे अनुकरण होताना दिसत आहे.”

Leave a Reply