Wednesday, June 10, 2026

Day: August 18, 2025

BusinessLatest News

टाटा क्लिक लक्झरीच्या विशेष भागीदारीत सब्यसाचीने सादर केले संपूर्ण भारतासाठी डिजिटल बुटिक

भारत  : टाटा क्लिक लक्झरी या भारतातील लक्झरी लाइफस्टाइलच्या अग्रगण्य प्लॅटफॉर्मने देशातील पहिले डिजिटल ज्वेलरी बुटिक सुरू करण्यासाठी सब्यसाची कलकत्ता या भारतातील प्रमुख लक्झरी ब्रँडशी विशेष भागीदारी जाहीर केली आहे. परंपरेची सांगड आणि डिजिटल नवकल्पना यांचा अनोखा संगम या भागीदारीत असेल. त्यामुळे सब्यसाचीचे अप्रतिम कारागिरीचे नमुने अधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या चिरंतन लक्झरीच्या वारशाला साजेसे राहतील. हे बुटिक २१ ऑगस्ट २०२५पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू होईल. सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचा सर्वांत मोठा संग्रह यामध्ये ऑनलाइन उपलब्ध असेल. १८ कॅरेट सोन्यात तयार करण्यात आलेल्या या संग्रहात कोलकात्याच्या सुप्रसिद्ध अटेलिअरमधून आलेल्या विविध फाइन ज्वेलरी कलेक्शन्सचा समावेश आहे. यातील रॉयल बंगाल हेरिटेज गोल्ड कलेक्शनमध्ये शुद्ध सोन्यात कोरलेले बंगाली वाघाचे प्रतीकचिन्ह आणि पारंपरिक सब्यसाची मंगळसूत्र यांचा समावेश आहे. रॉयल बंगाल डायमंड कलेक्शनमध्ये व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, मौल्यवान रत्ने आणि नैसर्गिक स्टोन चार्म्स जडवले आहेत. रॉयल बंगाल पर्ल सीरीजमध्ये नैसर्गिक, कल्चर्ड आणि‘साउथ सी मोत्यांचा समावेश आहे. सुंदरबन कलेक्शन या संग्रहात इतिहासात डोकावणाऱ्या प्राचीन हस्तकलेचे ज्ञान फुलाफळांच्या रूपात खुलणारे आहे. टायगर स्ट्राईप आणि शालिमार कलेक्शन्स ही १८ कॅरेट सोन्यात लॅकरची कलात्मक झाक देऊन तयार करण्यात आलेली आधुनिक प्रतीके आहेत. टायगर आय गटात हिरेजडित बंगाली वाघाचे प्रतीक आहे. इतर उत्पादनांच्या यादीत इअरिंग्स, लॉकेट्स, ब्रेसलेट्स आणि अंगठ्या आहेत. हे सर्व दागिने दैनंदिन वापरातील सौंदर्य लक्षात घेऊन घडवलेले आहेत. एखाद्या खास प्रसंगासाठीची खरेदी असो, वैयक्तिक स्टाईलसाठी असो किंवा मनापासून द्यावयाच्या भेटीसाठी असो, टाटा क्लिक लक्झरीच्या ग्राहकांना सब्यसाचीच्या या विविध उत्पादनांच्या खरेदीचा खास वैयक्तिक अनुभव जाणकार तज्ज्ञांच्या मदतीने घेता येईल. सब्यसाचीच्या सादरीकरणाविषयी बोलताना टाटा क्लिक लक्झरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल आस्थाना म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीमध्ये आम्ही भारतीय, तसेच जागतिक लक्झरीचा उत्सव साजरा करतो. जगातील सर्वोत्तम लक्झरी ब्रँड्सची जपून निवड करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला आणखी बळकटी देणारे हे सब्यसाचीचे सादरीकरण आहे. अप्रतिम कारागिरीसाठी आणि भारतीय परंपरेशी घट्ट नात्यासाठी सब्यसाची प्रसिद्ध आहे. हा ब्रॅंड पारंपरिक सौंदर्यशास्त्र आणि जागतिक आकर्षण यांचा अनोखा संगम सादर करतो. सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचे आमच्या प्लॅटफॉर्मवर पदार्पण होत असल्यामुळे आमच्या लक्झरी ज्वेलरी संग्रहाची प्रतिष्ठा अधिकच उंचावली आहे. देशातील टियर-२ व टियर-३ शहरांतील कलासक्त ग्राहकांसह संपूर्ण भारतात हा प्रतिष्ठित ब्रँड आम्ही पोहोचवीत आहोत. भारतातील आघाडीचा लक्झरी प्लॅटफॉर्म आणि देशातील सर्वाधिक गौरवशाली डिझायनर या निमित्ताने एकत्र येत असल्यामुळे डिजिटल युगातील फाइन ज्वेलरी अनुभवाची नवी व्याख्या या विशेष भागीदारीतून परिभाषित होत आहे.” सब्यसाची कलकत्ता एलएलपीचे संस्थापक व क्रिएटिव्ह डायरेक्टर सब्यसाची मुखर्जी म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर सब्यसाची फाइन ज्वेलरी सादर करताना मला अभिमान वाटतो. ज्यामुळे आमचा ब्रँड सदैव लोकांच्या मनात घर करून आहे, त्याच गाभ्याने, तेवढ्याच चिरंतन उच्च मानकांनी आणि तेवढ्याच विलक्षण मूल्यदृष्टीने हा संग्रह साकारला आहे. आमची किंमत स्वप्नवत नाही, तर वास्तवाशी जोडलेली आहे. सुसंस्कृत, परंपरांशी निगडित आणि चिरंतन ही मूल्ये ग्राहकांना ‘सब्यसाची हाऊस’कडून अपेक्षित असतात, ती सर्व या कलेक्शनमध्ये समाविष्ट आहेत. भारतात आपण किंमतींबद्दल बरेच बोलतो, पण मूल्याबद्दल फारसे बोलत नाही. तुम्ही लोकांना प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टता देता, तेव्हा त्यांना त्यातील फरक जाणवतो, हा माझा विश्वास आहे.” ‘सब्यसाची कलकत्ता एलएलपी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष चोप्रा म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर आमच्या फाइन ज्वेलरी लाईनचे पदार्पण होणे हा सब्यसाचीसाठी एक नवा रोमांचक अध्याय आहे. दोन दशकांहून अधिक काळ हा ब्रँड आपल्या प्रामाणिकतेसाठी, कारागिरीसाठी आणि शाश्वत मूल्यांसाठी ओळखला जातो. आता आमची ज्वेलरी ऑनलाइन लक्झरी रिटेलच्या जगात आणून आम्ही आमचे अटेलिअर्स आणि देशभरातील घरे यांच्यातील अंतर मिटवत आहोत. त्यामुळे नव्या पिढीला सब्यसाचीच्या मूल्यांचा अनुभव घेता येईल आणि ती मूल्ये आत्मसात करता येतील. अप्रतिम गुणवत्ता असलेली आमची फाइन ज्वेलरी आणि विचारपूर्वक ठरवलेल्या त्यांच्या किंमती, असा हा लक्झरीच्या जगात दुर्मिळ असलेला सुंदर मिलाफ आहे. टाटा क्लिक लक्झरीचे नवे दार उघडताना, आमची ज्वेलरी नवीन घरांमध्ये पोहोचेल आणि देशभरात नव्या कथांनी फुलेल, हे पाहण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहे.” सब्यसाचीच्या प्रतिष्ठित फाइन ज्वेलरीचे कलेक्शन २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरीवर उपलब्ध राहील.

Read More
ENGLISH

Special exhibition to honour world renowned poet Ernst Jandl on his 100th birth anniversary

Goethe-Institut / Max Mueller Bhavan Pune in collaboration with German Department of Savitribai Phule Pune University  is set to organise

Read More
Latest NewsPUNE

जागतिक अवयवदान दिनानिमित्त नोबल हॉस्पिटल तर्फे अवयवदाता कृतज्ञता सन्मान २०२५

पुणे :  जागतिक अवयवदान दिनानिमित्त नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे अवयवदाता कृतज्ञता सन्मान २०२५ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

Read More
Latest NewsPUNE

फॉरेस्ट काउंटी, खराडी येथे स्वातंत्र्यदिन उत्सव देशभक्तीच्या उत्साहात साजरा

फॉरेस्ट काउंटी, खराडी येथील स्वातंत्र्यदिन साजरा भव्यतेने आणि उत्साहात पार पडला. सकाळची सुरुवात झाली गॅलंट सिक्युरिटी सर्व्हिसच्या शिस्तबद्ध संचलनाने, त्यानंतर आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी काढलेल्या अभिमानास्पद मार्चने – हा हृदयस्पर्शी क्षण दिवसाची दिशा ठरवणारा ठरला. ध्वजारोहणानंतर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. लहानग्यांनी प्रोजेक्ट सिंदूर, केसरीवरील सादरीकरणाने सगळ्यांची मने जिंकली, तर ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेले हृदयस्पर्शी देशभक्तीपर गीत सर्वांना भावले. मनीष जोशींच्या जोशपूर्ण सूत्रसंचालनात मुलांसाठी घेतलेले मनोरंजक प्रश्नोत्तर सत्र प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमातील खास ठळक मुद्दे होते दोन प्रभावी भाषणे – लहानग्या येशा सिंग हिने “शैक्षणिक गुणांपेक्षा नैतिक मूल्यांना अधिक महत्त्व द्यायला हवे का?” या विषयावर केलेले विचारमंथन आणि कृशव शुक्लाने सादर केलेले “भारताची संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती” या विषयावरचे प्रभावी भाषण. त्यांच्या वयाच्या मानाने दोन्ही भाषणे असामान्य प्रगल्भतेची होती. संगीत आणि कवितेने देखील रंगत वाढवली – उन्नीकृष्णन आणि अक्षत यांचा गोड द्वंद्वगीताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकण्यास भाग पाडले, आपल्या संगीत सेना आणि एफसी सदस्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी देशप्रेम जागवले, तर श्री. तरुण जैन यांची विनोदी कविता प्रेक्षकांना हशा पिकवणारी ठरली. देशभक्ती, कला आणि एकतेचा संगम असलेला हा दिवस – एक असा उत्सव ठरला जो कायम स्मरणात राहील!

Read More
BusinessLatest News

महिंद्राची ‘ग्लोबल व्हिजन २०२७’ची घोषणा : मॉड्युलर, बहुऊर्जा स्वरुपाच्या एनयू-आयक्यू प्लॅटफॉर्मवर चार जागतिक दर्जांच्या एसयूव्ही डिझाइन संकल्पना सादर

मुंबई  : महिंद्रा अँड महिंद्रा या भारतातील अग्रगण्य एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज एनयू_आयक्यू हा आपला पूर्णपणे नवा, मॉड्युलर व बहुऊर्जा प्लॅटफॉर्म सादर

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वाढत्या घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट ‘लाडकी सून’ योजना राबविणार

ठाणे: प्रतिनिधी वाढत्या घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट ‘लाडकी सून’ योजना राबविणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

Read More
Latest NewsLIFESTYLE

प्रारंभ चित्रप्रदर्शन १९ ऑगस्ट पासून

पुणे  : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणरायाच्या भावनिक आणि प्रतीकात्मक रूपाचे दर्शन घेण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गोवंश हत्या बंदी कायदा हा कथित गोरक्षकांच्या मुजोरीमुळे गोपालक हत्या कायदा बनला

सांगली: प्रतिनिधी गोवंश रक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेला गोवंश हत्या बंदी कायदा हा कथित गोरक्षकांच्या मुजोरीमुळे गोपालक हत्या कायदा बनला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संजय शिरसाठ यांचा 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार; रोहित पवार यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात सिडकोचे अध्यक्ष असलेले संजय शिरसाठ यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

३७व्या पुणे फेस्टिव्हलचे २९ ऑगस्ट रोजी उद्घाटन!

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा गौरवशाली ३७वे वर्ष साजरे करीत आहे.  यंदा २७ ऑगस्ट ते

Read More
BusinessLatest News

गोदरेज लॉक्सतर्फे १४ टक्के विकासासह लक्षणीय प्रगती, स्मार्ट इनोव्हेशन आणि भारतकेंद्री धोरणामुळे विकासाला चालना

मुंबई – भारत ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्युशन्स व्यवसायाने होम सेफ्टी

Read More
ENGLISH

Keystone School of Engineering Files 110 Copyrights in Artificial Intelligence

Pune – Keystone School of Engineering has created a remarkable milestone by filing 110 copyrights in the domain of Artificial

Read More
Latest NewsPUNE

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर 110 कॉपीराइट नोंदणी

पुणे : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एक ऐतिहासिक कामगिरी बजावत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रात तब्बल ११०

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल – पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव

  कला, संगीत व ध्यानाच्या माध्यमातून ‘निर्वाण : ज्ञानप्राप्ती’ या विषयाची मांडणी पुणे : त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाऊंडेशन यांच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट आहे – माजी आमदार शहाजी पाटील

सांगोला: प्रतिनिधी संजय राऊत हा भविष्य सांगणारा पोपट आहे. मात्र, आजपर्यंत त्यांनी काढलेली एकही चिठ्ठी, त्यांचे कोणतेच भविष्यकथन खरे ठरलेले

Read More