Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

जागतिक अवयवदान दिनानिमित्त नोबल हॉस्पिटल तर्फे अवयवदाता कृतज्ञता सन्मान २०२५

पुणे :  जागतिक अवयवदान दिनानिमित्त नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे अवयवदाता कृतज्ञता सन्मान २०२५ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात अवयवदात्यांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबियांचे अनुभव कथन करण्यात आले. नोबल हॉस्पिटल तर्फे अवयवदानाच्या या महान कार्याने समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबियांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नोबल हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, संचालक डॉ.दिविज माने, समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे आणि वरिष्ठ व्यवस्थापन सदस्य, कर्मचारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
नोबल हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, जिवंत दाता असो की मेंदू मृत दाता व  त्यांचे नातेवाईक,अवयवदानामागे धैर्य व अनेक भावना असतात. आज प्राप्तकर्त्यांनी सांगितलेल्या अनुभवावरून त्यांची इच्छाशक्ती व दृढ निश्चय दिसून येतो.
 
संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, आज उपस्थितांचे अनुभव ऐकून आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधान आणि  आनंद काय असतो हे समजते.  अशा उपक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
अवयवदानाबाबत सहभागींनी घेतलेल्या प्रतिज्ञेचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे यांनी कौतुक केले. 
 
नेफ्रोलॉजिस्ट डॉ.अविनाश इग्नाशिअस म्हणाले की,अवयवदानामुळे फक्त प्राप्तकर्ता रुग्णाचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा पुनर्जन्म होतो. त्यामुळे हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
 
आर.जे. बंड्या यांनी सूत्रसंचालन केले. 
 
प्राप्तकर्त्यांनी आपला अनुभव सांगताना वर्षानुवर्षे डायलिसिसचा आव्हानात्मक अनुभव, व्यथा, कुटुंबीय व डॉक्टर आणि रुग्णालयाची साथ, प्रत्यारोपणानंतर होणारे परिवर्तन असा कंठ दाटून येणारे अनुभव सांगितले. डॉक्टरांचा सल्ला शिस्तीने पाळला तर प्रत्यारोपणानंतर आपण सामान्य आयुष्य जगू शकतो असे त्यांनी सांगितले. रुग्णालय, डॉक्टर आणि कर्मचारी या संपूर्ण प्रवासात खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
 सर्वांनी अवयवदानाच्या प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading