भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे सुमीत फॅसिलिटीजकडून भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाची स्वच्छता
पुणे: सुमीत फॅसिलिटीजने पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर येथे विशेष ‘स्वच्छता सप्ताह’ राबवला. २ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत,श्रावण महिन्याच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.सुमीत फॅसिलिटीजने स्वतः पुढाकार घेत ही स्वच्छता मोहीम सातत्याने राबवली. भीमा नदीच्या उगमस्थळासह मंदिर परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाची विशेष स्वच्छता करण्यात आली. उगमस्थळी साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा आणि भाविकांकडून अर्पण करण्यात आलेले निर्माल्य काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेसाठी २५ ते ३० सफाई कर्मचारी आणि ३ पर्यवेक्षक, तसेच स्वतंत्र देखरेख वाहन, कचरापेट्या, झाडू व इतर स्वच्छता साहित्य, कचऱ्याच्या पिशव्या आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई किट्स) उपलब्ध करून देण्यात आली. मोहिमेदरम्यान कचरा व प्लास्टिक संकलन, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट तसेच नाल्यांची स्वच्छता अशी विविध कामे करण्यात आली.श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत होता. सुमीत फॅसिलिटीजच्या पथकाने दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले.
मुंबईतील जुहू आणि वरळी समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता उपक्रमानंतर सुमीत फॅसिलिटीजने भीमाशंकर येथेही स्वच्छता मोहीम राबवली. महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर तीर्थक्षेत्रात स्वच्छता आणि सार्वजनिक सेवेसाठी सुमीत फॅसिलिटीजने पुढाकार घेतला.
सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सुमित साळुंके म्हणाले, “भीमाशंकर हे केवळ आध्यात्मिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र नाही, तर याच ठिकाणाहून भीमा नदीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे या पवित्र स्थळाची आणि जीवनदायी नदीच्या उगमाची काळजी घेणे, ही आमच्यासाठी खरी सेवा आहे. आमची ही स्वच्छता मोहीम केवळ कचरा हटवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर श्रद्धा, पर्यावरण आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या सामूहिक जबाबदारीचा आदर व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न होता. सुमीत ग्रुपमध्ये स्वच्छता हीदेखील सेवेचेच एक रूप मानले जाते, म्हणजेच स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीची निःस्वार्थपणे काळजी घेणे. भीमाशंकर येथे केलेल्या आमच्या याप्रयत्नातून अधिक जागरूकता निर्माण होईल आणि आपल्या धार्मिक स्थळांसोबतच नैसर्गिक वारशाचे स्वच्छता व संरक्षण करण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”
