केएफआयएलची आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीची कामगिरी जाहीर; स्वतंत्र महसूल 2,047 कोटी रु., वार्षिक 17% वाढ; करपूर्व नफा 138 कोटी रु., वार्षिक 15% वाढ
पुणे : भारतातील आघाडीच्या कास्टिंग आणि पिग आयर्न उत्पादक कंपन्यांपैकी एक तसेच स्टील आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई : 500245) ने आज आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले आर्थिक निकाल जाहीर केले.
आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना, केएफआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. गुमास्ते म्हणाले, “आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत केएफआयएलने चांगली कामगिरी कायम राखत महसुलात वार्षिक 17% वाढ नोंदवली असून तो 2,047 कोटी रु. इतका झाला आहे. तसेच, EBITDA मध्ये वार्षिक 4% वाढ होऊन तो 223 कोटी रु. इतका झाला आहे. क्षमतेचा अधिक कार्यक्षम वापर हा या वाढीचा प्रमुख आधार होता. यामध्ये 26,606 मेट्रिक टन इतकी विक्रमी स्टील विक्री आणि एकूण कास्टिंग विक्री प्रमाणाने 50,000 मेट्रिक टनांचा टप्पा ओलांडण्याचा ऐतिहासिक टप्पा यांचा समावेश आहे.
कोकिंग कोळशाच्या किमतींमधील वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन होऊनही आमच्या सक्रिय खर्च व्यवस्थापन उपाययोजनांमुळे नफ्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत झाली. बाजारपेठेतील मागणीचे अनुकूल संकेत आम्हाला स्टील आणि कास्टिंग उत्पादन क्षमतांचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. आगामी काळात, नव्याने कार्यान्वित केलेल्या सौर ऊर्जा क्षमतेचा आणि प्रमुख विस्तार प्रकल्पांचा प्रभावी वापर करून खर्चाच्या बाबतीत आमची स्पर्धात्मकता आणखी वाढवण्यावर आमचा भर राहील.”
आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीतील आणि वर्षाच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या (YTD) स्वतंत्र आर्थिक कामगिरीचा आढावा:
| Rs. Cr | Q2 FY27 | Q2 FY26 | YoY | YTD FY 27 | YTD FY26 | YoY |
| Revenue | 2,046.7 | 1,755.3 | 17% | 3,818.2 | 3,453.4 | 11% |
| EBITDA (before exceptional items) | 223.0 | 214.4 | 4% | 438.7 | 431.3 | 2% |
| EBITDA Margin | 10.9% | 12.2% | 11.5% | 12.5% | ||
| PBT (After exceptional items) | 137.8 | 119.9 | 15% | 242.9 | 247.1 | -2% |
| PAT# | 97.6 | 88.5 | 10% | 179.9 | 324.0 | -44% |
आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीतील आणि वर्षाच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या (YTD) एकत्रित आर्थिक कामगिरीचा आढावा:
| Rs. Cr | Q2 FY27 | Q2 FY26 | YoY | YTD FY 27 | YTD FY26 | YoY |
| Revenue | 2,046.7 | 1,755.3 | 17% | 3,818.2 | 3,453.4 | 11% |
| EBITDA (before exceptional items) | 222.98 | 214.42 | 4% | 438.7 | 431.3 | 2% |
| EBITDA Margin | 10.9% | 12.2% | 11.5% | 12.5% | ||
| PBT (After exceptional items) | 137.8 | 119.9 | 15% | 242.9 | 249.6 | -3% |
| PAT# | 97.5 | 88.5 | 10% | 179.9 | 326.5 | -45% |
# आर्थिक वर्ष 2026-27 दरम्यान ऑलिव्हर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अडिक्का एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे कंपनीमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे आर्थिक वर्ष 2025-26 मधील संबंधित तिमाहींचे आर्थिक निकाल या योजनेची अंमलबजावणी विचारात घेऊन अद्ययावत करण्यात आले आहेत. याशिवाय, कंपनीने या योजनेनुसार निर्धारित तारखेला म्हणजेच 01 एप्रिल 2025 रोजी स्थगित कर मालमत्तेची (Deferred Tax Asset) नोंद केली आहे. या मालमत्तेचा वापर मागील तिमाहींमध्ये तसेच चालू तिमाहीत आणि 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आला आहे. परिणामी, मागील वर्षाच्या आर्थिक आकडेवारीवर नकारात्मक कराचा परिणाम झाला आहे.
कृपया नोंद घ्यावी की, ऑलिव्हर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अडिक्का एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे कंपनीमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर मागील वर्षातील सर्व आर्थिक आकडेवारीची पुनर्मांडणी करण्यात आली आहे.
