डीआरएचपी लिकं : https://www.bseindia.com/corporates/download/383596/IPO%20Prior/DRHP_fractal_20250812235510.pdf जागतिक स्तरावर ओळखली जाणारी एंटरप्राइझ एआय कंपनी ‘फ्रॅक्टल अॅनालिटिक्स’ने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये (आयपीओ) ₹ 12,793 दशलक्ष मूल्याच्या नवीन इक्विटी शेअर्सचा इश्यू (फ्रेश इश्यू) आणि ₹ 36,207 दशलक्ष मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या विक्री प्रस्तावाचा (ऑफर फॉर सेल) समावेश आहे. ₹1 दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा हा विक्री प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) क्विनॅग बिडको लिमिटेडकडून ₹14,626 दशलक्ष, टीपीजी फेट होल्डिंग्ज पीटीई लिमिटेडकडून ₹ 19,996 दशलक्ष, सत्य कुमारी रेमाला आणि राव वेंकटेश्वरा रेमाला यांच्याकडून ₹ 295 दशलक्ष आणि जीएलएम फॅमिली ट्रस्टकडून ₹ 1,290 दशलक्ष असा आहे. (सर्व “सेलिंग शेअरहोल्डर्स” ) ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून, नियम 6(2) च्या अनुसार केली जात आहे, ज्यामध्ये निव्वळ ऑफरपैकी 75% भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs), 15% भाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना आणि 10% भाग किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध असेल. यात पात्र कर्मचाऱ्यांसाठी सबस्क्रिप्शनचा आरक्षित हिस्सा (एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन) देखील आहे, जो कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलच्या 5% पेक्षा जास्त नसेल. कंपनी मुख्य बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) यांच्याशी सल्लामसलत करून, लागू कायद्यांतर्गत आणि आपल्या निर्णयाधिकाराने, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) कडे दाखल करण्यापूर्वी ₹ 2,558 दशलक्षपर्यंतच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करू शकते. जर प्री-आयपीओ प्लेसमेंट केली गेली, तर त्याची किंमत कंपनी आणि मुख्य बुक रनिंग लीड मॅनेजर्स यांच्या सल्ल्यानुसार निश्चित केली जाईल. फ्रॅक्टल अॅनालिटिक्स या ऑफरमधून मिळणारा निव्वळ निधी कंपनीच्या उपकंपनी ‘फ्रॅक्टल यूएसए’मध्ये गुंतवणुकीसाठी, त्याच्या कर्जाचे पूर्ण किंवा अंशतः पूर्व-भरण (प्री-पेमेंट) किंवा नियोजित परतफेड (शेड्युल्ड रिपेमेंट) करण्यासाठी; लॅपटॉप खरेदीसाठी; भारतात नवीन कार्यालयाची स्थापना करण्यासाठी; संशोधन व विकास (R&D), तसेच ‘फ्रॅक्टल अल्फा’अंतर्गत विक्री व विपणनासाठी; त्याचप्रमाणे अद्याप निश्चित न झालेल्या कंपन्यांच्या अधिग्रहणाद्वारे (अॅक्विझिशन्स) आणि इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे असंगठित वाढीसाठी (इनॉर्गेनिक ग्रोथ) व सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. सन 2000 मध्ये स्थापन झालेली ‘फ्रॅक्टल’ ही कंपनी श्रीकांत वेलमाकन्नी आणि प्रणय अग्रवाल यांनी सह-स्थापित केली आहे. ही कंपनी विविध उद्योग क्षेत्रांतील आणि व्यवसाय कार्यक्षेत्रांतील मोठ्या जागतिक उद्योगांना डेटा-आधारित विश्लेषण (इन्साइट्स) पुरविते व एंड-टू-एंड एआय सोल्युशन्सच्या माध्यमातून निर्णयप्रक्रियेत मदत करते. टीपीजी, एपॅक्स आणि गजा यांसारख्या नामांकित गुंतवणूकदारांच्या पाठबळावर उभी असलेली, देशातील आघाडीची शुद्ध डेटा व कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कंपनी ग्राहक पॅकेज्ड वस्तू व रिटेल, तंत्रज्ञान, मीडिया व दूरसंचार, आरोग्यसेवा व लाइफ सायन्सेस, तसेच बँकिंग, वित्तीय सेवा व विमा अशा विविध क्षेत्रांमध्ये डोमेन तज्ज्ञता (डोमेन एक्स्पर्टीज) राखते.
Read More