टीपीजी, एपॅक्स, गजा समर्थित एंड-टू-एंड एआय सोल्युशन्स कंपनी ‘फ्रॅक्टल अॅनालिटिक्स’चा 4,900 कोटींच्या आयपीओसाठी अर्ज
डीआरएचपी लिकं : https://www.bseindia.com/corporates/download/383596/IPO%20Prior/DRHP_fractal_20250812235510.pdf
जागतिक स्तरावर ओळखली जाणारी एंटरप्राइझ एआय कंपनी ‘फ्रॅक्टल अॅनालिटिक्स’ने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये (आयपीओ) ₹ 12,793 दशलक्ष मूल्याच्या नवीन इक्विटी शेअर्सचा इश्यू (फ्रेश इश्यू) आणि ₹ 36,207 दशलक्ष मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या विक्री प्रस्तावाचा (ऑफर फॉर सेल) समावेश आहे.
₹1 दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा हा विक्री प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) क्विनॅग बिडको लिमिटेडकडून ₹14,626 दशलक्ष, टीपीजी फेट होल्डिंग्ज पीटीई लिमिटेडकडून ₹ 19,996 दशलक्ष, सत्य कुमारी रेमाला आणि राव वेंकटेश्वरा रेमाला यांच्याकडून ₹ 295 दशलक्ष आणि जीएलएम फॅमिली ट्रस्टकडून ₹ 1,290 दशलक्ष असा आहे. (सर्व “सेलिंग शेअरहोल्डर्स” )
ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून, नियम 6(2) च्या अनुसार केली जात आहे, ज्यामध्ये निव्वळ ऑफरपैकी 75% भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs), 15% भाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना आणि 10% भाग किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध असेल. यात पात्र कर्मचाऱ्यांसाठी सबस्क्रिप्शनचा आरक्षित हिस्सा (एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन) देखील आहे, जो कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलच्या 5% पेक्षा जास्त नसेल.
कंपनी मुख्य बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) यांच्याशी सल्लामसलत करून, लागू कायद्यांतर्गत आणि आपल्या निर्णयाधिकाराने, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) कडे दाखल करण्यापूर्वी ₹ 2,558 दशलक्षपर्यंतच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करू शकते. जर प्री-आयपीओ प्लेसमेंट केली गेली, तर त्याची किंमत कंपनी आणि मुख्य बुक रनिंग लीड मॅनेजर्स यांच्या सल्ल्यानुसार निश्चित केली जाईल.
फ्रॅक्टल अॅनालिटिक्स या ऑफरमधून मिळणारा निव्वळ निधी कंपनीच्या उपकंपनी ‘फ्रॅक्टल यूएसए’मध्ये गुंतवणुकीसाठी, त्याच्या कर्जाचे पूर्ण किंवा अंशतः पूर्व-भरण (प्री-पेमेंट) किंवा नियोजित परतफेड (शेड्युल्ड रिपेमेंट) करण्यासाठी; लॅपटॉप खरेदीसाठी; भारतात नवीन कार्यालयाची स्थापना करण्यासाठी; संशोधन व विकास (R&D), तसेच ‘फ्रॅक्टल अल्फा’अंतर्गत विक्री व विपणनासाठी; त्याचप्रमाणे अद्याप निश्चित न झालेल्या कंपन्यांच्या अधिग्रहणाद्वारे (अॅक्विझिशन्स) आणि इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे असंगठित वाढीसाठी (इनॉर्गेनिक ग्रोथ) व सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
सन 2000 मध्ये स्थापन झालेली ‘फ्रॅक्टल’ ही कंपनी श्रीकांत वेलमाकन्नी आणि प्रणय अग्रवाल यांनी सह-स्थापित केली आहे. ही कंपनी विविध उद्योग क्षेत्रांतील आणि व्यवसाय कार्यक्षेत्रांतील मोठ्या जागतिक उद्योगांना डेटा-आधारित विश्लेषण (इन्साइट्स) पुरविते व एंड-टू-एंड एआय सोल्युशन्सच्या माध्यमातून निर्णयप्रक्रियेत मदत करते.
टीपीजी, एपॅक्स आणि गजा यांसारख्या नामांकित गुंतवणूकदारांच्या पाठबळावर उभी असलेली, देशातील आघाडीची शुद्ध डेटा व कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कंपनी ग्राहक पॅकेज्ड वस्तू व रिटेल, तंत्रज्ञान, मीडिया व दूरसंचार, आरोग्यसेवा व लाइफ सायन्सेस, तसेच बँकिंग, वित्तीय सेवा व विमा अशा विविध क्षेत्रांमध्ये डोमेन तज्ज्ञता (डोमेन एक्स्पर्टीज) राखते.
कंपनीचे संपूर्ण एआय सोल्युशन्स पोर्टफोलिओ ‘Fractal.ai’ अंतर्गत दिले जाते. यात तिचा फ्लॅगशिप एजेन्टिक एआय प्लॅटफॉर्म ‘Cogentiq’ समाविष्ट आहे, जो प्री-बिल्ट एजंट्स, टूल्स, कनेक्टर्ससह लो-कोड, सुरक्षा, गव्हर्नन्स, ऑडिटेबिलिटी आणि इंटर-ऑपरेबिलिटी यांसारख्या अंगभूत वैशिष्ट्यांची सोय करतो, तसेच ‘Fractal Alpha’ अंतर्गत स्वतंत्र एआय व्यवसायांचा समावेश आहे, जे वेगवेगळ्या व्यवस्थापनाखाली काम करत, महत्त्वाच्या ग्राहकांना (मस्ट-विन क्लायंट्स), तसेच विस्तृत बाजारपेठा व भौगोलिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात.
अॅमिका इन्शुरन्स, सी३ एआय, सिटीबँक, कॉस्टको, फ्रँकलिन टेम्पलटन, मार्स, मॉंडेलेज, नेस्ले, फिलिप्स यांसारख्या 113 ‘मस्ट-विन’ ग्राहकांना सेवा देण्याबरोबरच, कंपनीकडे एकूण 5,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 4,600 कर्मचारी भारतात कार्यरत आहेत.
कंपनीला आपल्या एकूण उत्पन्नापैकी 66% पेक्षा जास्त महसूल अमेरिकन बाजारातून, 17.7% महसूल युरोपमधून आणि उर्वरित महसूल एपीएसी (आशिया पॅसिफिक) प्रदेशातून मिळतो, जे ‘विकसित भारत’ आणि जागतिक क्षमतांच्या वाढत्या कहाणीला अधोरेखित करते.
उद्योग अहवालानुसार, एआय आणि जनरेटिव्ह एआय सॉफ्टवेअर पोर्टफोलिओ, तसेच संशोधन-विकास (R&D) उपक्रमांच्या विस्तारासाठी सक्रिय गुंतवणुकीमुळे ही कंपनी उद्योगातील इतर स्पर्धकांमध्ये वेगळ्या स्थानावर आहे. 31 मार्च 2025 पर्यंत मायक्रोसॉफ्ट, अॅपल, एनव्हिडिया, अल्फाबेट, अॅमेझॉन, मेटा आणि टेस्ला यांसारख्या बहुतेक दिग्गज कंपन्यांना ती सेवा पुरवित आहे.
विशेष म्हणजे, कंपनीने स्वतःचा डिफ्युजन आधारित टेक्स्ट-टू-इमेज मॉडेल ‘Kalaido.ai’ विकसित केला आहे; तसेच ‘Vaidya.ai’ नावाचे वैद्यकीय मल्टिमोडल फाउंडेशनल इकोसीस्टम तयार केले आहे, ज्यामध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल्स, व्हिजन-लँग्वेज मॉडेल्स आणि वैद्यकीय विचारप्रक्रिया प्रणाली (मेडिकल रिझनिंग सीस्टिम्स) यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनीने गणितीय विचारप्रक्रियेचे लार्ज मॉडेल विकसित केले असून, ‘Fathom-R1-14B’ नावाचे मोठे एआय रिझनिंग फाउंडेशन मॉडेल व त्याचे डेटासेट्स ओपन सोर्स केले आहेत. त्यांची इतर अनेक उत्पादने सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत.
फ्रॅक्टलच्या ऑपरेशन्समधील महसुलात आर्थिक वर्ष 2025 मध्ये 25.9% वाढ होऊन तो ₹ 2,765 कोटींवर पोहोचला, जो आर्थिक वर्ष 2024 मधील ₹ 2,196 कोटींवरून वाढला आहे. त्याचप्रमाणे, करानंतरचा नफा (PAT) आर्थिक वर्ष 2024 मधील ₹ (54.7) कोटींवरून वाढून आर्थिक वर्ष 2025 मध्ये ₹ 220 कोटींवर गेला. पीएटी आणि ईबीआयटीडीए मार्जिनमध्येही सुधारणा झाली असून, ते अनुक्रमे (0.2%) वरून 12.6% आणि 10.6% वरून 17.4% झाले आहेत.
सन 2023 ते 2025 दरम्यान, फ्रॅक्टलने 18% सीएजीआर (CAGR) दराने वाढ नोंदविली आहे, जी तृतीय पक्ष डेटा, अॅनालिटिक्स आणि एआय सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या 11% वाढीपेक्षा जास्त आहे.
कंपन्यांना वेगाने बदलणाऱ्या डेटा, अॅनालिटिक्स आणि एआय (DAAI) बाजारात योग्य प्रतिभा व तंत्रज्ञान मिळविणे, तसेच अंतर्गत खर्च आणि मूलभूत कौशल्ये (कोर कॉम्पिटन्सीज) सांभाळणे अवघड जात असल्यामुळे त्या वाढत्या प्रमाणात तृतीय पक्ष सेवा प्रदात्यांशी संलग्न होत आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये या क्षेत्राचा एकूण संभाव्य बाजार (टोटल अॅड्रेसेबल मार्केट) अंदाजे $143 अब्ज इतका होता आणि 2030 पर्यंत तो 16.7% सीएजीआर दराने वाढून $310 अब्ज इतका होईल, असा अंदाज आहे.
या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत आहेत.
