Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

भारतातील उ‌द्योग-समाकलित हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचा नवीन मापदंड स्थापित करण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल

पुणे  : भारतातील उ‌द्योग-समाकलित हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचा नवीन मापदंड स्थापित करत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) आणि ए-स्टार अकॅडमी यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य शैक्षणिक करार आज औपचारिकरीत्या करण्यात आला.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या कार्यालयातील ऐतिहासिक मुख्य इमारतीमध्ये, एसपीपीयूच्या वतीने या सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आला. हॉस्पिटॅलिटी शिक्षणातील या क्रांतिकारी शिक्षण पद्धतीचे सूत्रधार अॅम्बी व्हॅली सिटी व हॉटेल सहारा स्टारचे कार्यकारी संचालक रोमी दत्त यांनी ए-स्टार अकॅडमीच्या वतीने करारावर स्वाक्षऱ्या केल्या. अ‍ॅम्बी व्हॅलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार हे देखील यावेळी उपस्थित होते.

या विशेष भागीदारी‌द्वारे विविध पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करणे अपेक्षित असून, सुरुवात म्हणून तीन वर्षांचा हॉस्पिटॅलिटी स्टडीजसाठी बी. एससी पदवी अभ्यासक्रम घेण्यात येईल. एसपीपीयू हे पदवी/डिप्लोमा/प्रमाणपत्र प्रदान करणारे संस्थान असेल, तर ए-स्टार अकॅडमी शैक्षणिक कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार आहे.

ए-स्टार अकॅडमी, अ‍ॅम्बी व्हॅली सिटी आणि हॉटेल सहारा स्टार यांचा उपक्रम, अनुभवात्मक आणि हस्तगत शिक्षणाच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी शिक्षणाची नव्याने व्याख्या करण्यास कटिबद्ध आहे. पारंपरिक अभ्यासक्रम व आधुनिक उ‌द्योगाच्या गरजा यामधील दरी भरून काढण्यासाठी, विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच वास्तव उ‌द्योग परिसराबरोबर जुळवून घेता येईल अशा प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे.

उ‌द्योगातील कार्यरत तज्ज्ञांनी तयार केलेला आणि पुरवलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सद्य परिस्थितीनुसार आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य आणि जागतिक पातळीवर उ‌द्योगात लागू होणारी पात्रता मिळवून देईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधारभूत सै‌द्धांतिक शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कार्यक्षमता देखील प्राप्त होईल. हा सहकार्य प्रकल्प शिक्षण व रोजगारातील तफावत दूर करणाऱ्या सामर्थ्यक दृष्टिकोनाविषयी बोलतो, नेतृत्व, नवोपक्रम व उ‌द्योजकतेस प्रोत्साहन देतो.

एसपीपीयू व ए-स्टार अकॅडमी एकत्र येऊन हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचा नवीन मानदंड निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत – जिथे शिक्षण आणि उ‌द्योगातील उत्कृष्टता यांची सांगड घालण्यात येईल.

Leave a Reply