Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात नारीशक्तीचा एल्गार! 35 हजार महिलांना उद्योजिका बनवणार ‘गर्जे मराठी’

पुणे:  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महिला केवळ चूल आणि मूल न सांभाळता, स्वतःचा उद्योग उभारून देशाची अर्थव्यवस्था चालवणार आहेत! याच जिद्दीने ‘गर्जे मराठी ग्लोबल’ ने पुण्यात एका क्रांतिकारी उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे.

पुण्यातील ऐतिहासिक सीओईपीच्या भाऊ इन्स्टिट्यूटमध्ये *’इच वुमन चॅम्पियन’ (Each Woman Champion)* या महत्त्वाकांक्षी मिशनचा उत्साहात शुभारंभ झाला. या मिशन अंतर्गत *पुढील 5 वर्षांत महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 350 तालुक्यांमधील 35 हजार महिलांना* प्रत्यक्ष उद्योजिका बनवण्याचे ध्येय आहे.

“महिला स्वावलंबी तर गाव समृद्ध”

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे म्हणाले, “महिलांच्या हाती देशाची खरी प्रगती आहे. महिला शिकली तर कुटुंब शिकतं, महिला उद्योजिका झाली तर गाव समृद्ध होतं.

तर गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा *राजश्री पाटील* यांनी सांगितले, “शेतीवर अवलंबून न राहता, महिलांनी उद्योग उभा केला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.”

*काय आहे ‘इच वुमन चॅम्पियन’ मध्ये?*
– दरवर्षी *7000 महिलांना* मोफत मार्गदर्शन
– *12 आठवड्यांचा* प्रोफेशनल बिझनेस कोर्स (ऑनलाइन + ऑफलाइन)
– व्यवसाय, पैशांचे नियोजन, मार्केटिंग आणि ब्रँडिंगचे धडे
– देशातील मोठे उद्योजक, गुंतवणूकदार थेट मार्गदर्शन करणार

यावेळी अमेरिकेतून गर्जे मराठीचे संस्थापक *आनंद गानू* यांनी ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.गर्जे मराठीचे संचालक माधव दाबके, विजय तळेले आणि प्रसाद प्रधान, डॉ. हेमंत जोगळेकर, डॉ. सुचेता पटवर्धन-पवार, जयश्री भिडे* यांची प्रमुख उपस्थिती होती.

पहिल्या टप्प्यात येत्या डिसेंबर ते मार्च दरम्यान *25 तालुक्यांतील 500 महिलांना* प्रशिक्षण देऊन या चळवळीला सुरुवात होणार आहे..यावेळी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply