Wednesday, November 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एक मागणी कायद्यात बसणारी नसल्याने ती मान्य करता येणार नाही – गिरीश महाजन

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या जवळ जवळ सर्व मागण्या मान्य झाल्या असून उरलेली एक मागणी कायद्यात बसणारी नसल्याने ती मान्य करता येणार नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता थांबावे, अशी स्पष्टोक्ती मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

जात पडताळणी प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी आता जरांगे पाटील करत आहेत. मात्र, ही मागणी मागणीमुळे कदाचित शक्य नाही. सरकारला निर्णय घेताना संविधानाची चौकट पाळावी लागते तसेच सर्वांचा साकल्याने विचार करावा लागतो. त्यामुळे कायद्यात न बसणाऱ्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह जरंगे पाटील यांनी धरू नये, असे आवाहन महाजन यांनी केले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांच्या 13 पैकी 12 मागण्या सरकारने मान्य केले आहे. जात पडताळणी रद्द करण्याची मागणी मान्य होऊ शकत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या अभ्यासकांनी देखील ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता टोकाची भूमिका घेऊ नये, असेही महाजन म्हणाले.

Leave a Reply