डीएस ग्रुपच्या पल्स कँडीतर्फे नॅशनल कँडी डे 2026 निमित्त एआर-आधारित, शरीराच्या हालचालींनी खेळता येणारा स्पेस गेम सादर
पुणे : नॅशनल कँडी डेच्या निमित्ताने देशातील आघाडीचा एफएमसीजी आणि बहुव्यावसायिक समूह धर्मपाल सत्यपाल ग्रुपने (डीएस ग्रुप- DS Group) पल्स कँडी डे मोहिमेच्या 2026 आवृत्तीची घोषणा केली.
ब्रँडच्या वार्षिक राष्ट्रीय उत्सवाचा भाग असलेली यंदाची मोहीम पुन्हा एकदा तंत्रज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन आली आहे. या आवृत्तीत अंतराळ संकल्पनेवर आधारित एक खिळवून ठेवणारा गेम सादर करण्यात आला आहे. खेळाडू हा गेम आपल्या हातांच्या आणि शरीराच्या हालचालींनी नियंत्रित करतात, ज्या स्मार्टफोनचा कॅमेरा टिपतो. हा अनुभव त्यांना थेट http://www.pulsecandyday.com या खास मायक्रोसाइटवर घेऊन जातो.
जेन झी, तरुण आणि मोबाइलवर अधिक सक्रिय असलेल्या ग्राहकांसाठी तयार केलेला हा छोटेखानी गेम पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी आणि सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करतो. नॅशनल कँडी डेच्या आसपासच्या आठवड्यात, 3 ते 10 नोव्हेंबरदरम्यान हा गेम उपलब्ध असेल. यात वापरकर्त्यांना 60 सेकंदांच्या आंतरतारकीय साहसावर नेले जाते, जिथे त्यांना अंतराळात विखुरलेल्या पल्स कँडी गोळा करायच्या असतात आणि नकली कँडी, लघुग्रह व इतर खगोलीय अडथळे टाळायचे असतात. या मोहिमेत कॅमेऱ्यावर आधारित मोशन आणि जेश्चर ट्रॅकिंगचा वापर करण्यात आला आहे, जे वापरकर्त्याच्या हात आणि शरीराच्या हालचालींना रिअल टाइममध्ये प्रतिसाद देते. हा अनुभव थेट मोबाइल ब्राउझरवर चालतो आणि त्यासाठी कोणताही हेडसेट, कंट्रोलर किंवा अतिरिक्त हार्डवेअर लागत नाही.
डीएस ग्रुपचे सीनियर जनरल मॅनेजर, मार्केटिंग, कन्फेक्शनरी अरविंद कुमार म्हणाले, “प्रत्येक नॅशनल कँडी डे आम्हाला आठवण करून देतो की लोकांचे पल्स कँडीवर किती प्रेम आहे. ही ‘दीवानगी’ आम्हाला त्यांच्यासोबत अशा प्रकारे साजरी करायची आहे, जी त्यांच्या कायम लक्षात राहील. नावीन्य हा नेहमीच पल्स कँडी डेचा गाभा राहिला आहे. दरवर्षी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या सीमा ओलांडतो, आणि तरीही अनुभव इतका सोपा ठेवतो की कोणालाही त्याचा आनंद घेता यावा. याआधी आमच्या चाहत्यांनी पल्स कँडीसाठी आरोळी ठोकली आणि फुंकर मारली, तर यंदा ते पल्ससाठी हालचाल करतील, केवळ आपल्या फोनच्या साहाय्याने अंतराळात तिचा पाठलाग करत.”
