Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

गोदरेज लॉक्सतर्फे १४ टक्के विकासासह लक्षणीय प्रगती, स्मार्ट इनोव्हेशन आणि भारतकेंद्री धोरणामुळे विकासाला चालना

मुंबई – भारत ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्युशन्स व्यवसायाने होम सेफ्टी क्षेत्रात दोन आकडी विकासासह आघाडीचे स्थान मिळवले आहे. कंपनीतर्फे सातत्याने विकास केला जात असून नाविन्यपूर्ण उत्पादनेही सादर केली जात आहे. कंपनी सध्या वार्षिक पातळीवर १२- १४ टक्क्यांनी प्रगती करत असून पारंपरिक व डिजिटल लॉक्स क्षेत्रात #1 स्थान मिळवले आहे. कंपनी आर्थिक वर्ष २६ ची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

या विकासाला स्मार्ट, नाविन्यपूर्ण उत्पादने, बहुमाध्यमिक विस्तार आणि दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील बाजारपेठांमध्ये खोलवर विकास अशा घटकांमुळे चालना मिळत असून त्यांचा एकूण उत्पन्नातील हिस्सा ६० टक्के आहे. कंपनीचा समतोल पोर्टफोलिओ लॉक्स आणि आर्किटेक्चरल उत्पादनांमध्ये ५०- ५० विभागला गेला असून त्यावरून सुरक्षा तसेच डिझाइन अशा दोन्ही क्षेत्रांतील कंपनीची ताकद दिसून येते. लॉक्स हे ब्रँडचे मुख्य उत्पादन असून आर्किटेक्चरल सोल्यूशन्स (एएस) वेगाने विकसित होत असून भारतात प्रीमियम इंटेरियर्स आणि शहरी पायाभूत सुविधा क्षेत्राकडून मिळत असलेली वाढती मागणी पूर्ण करत आहे.

डिजिटल लॉक्स विभागाचा कंपनीच्या विकासात मोठा वाटा आहे. हा उत्पादन विभाग ५५ टक्क्यांसह विकसित होत असून कीलेस, कनेक्टेड सुरक्षा उत्पादनांना असलेल्या वाढत्या मागणीमुळे चालना मिळत आहे. मेकॅनिकल ते स्मार्ट लॉक्सपर्यंत झालेल्या प्रगतीवरून ब्रँडमध्ये झालेला विकास आणि स्वावलंबन तसेच नाविन्याप्रती बांधिलकी दिसून येते.

लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्यूशन्स व्यवसायाचे प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, ‘शतकभरापेक्षा जास्त जुना वारसा लाभलेली भारतीय कंपनी या नात्याने आम्ही मोठ्या शहरांपासून छोट्या गावांपर्यंत भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेत आहोत. कंपनीच्या विकासाला नाविन्यामुळे चालना मिळत आहे, कंपनीचे कामकाज विश्वास आणि सुसंगत उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारे आहे. डिजिटल- फर्स्ट धोरण वेगाने विकसित होत असून ई- कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील आमच्या अस्तित्वाचा एकूण उत्पन्नातील वाटा ५ टक्के आहे आणि पुढील पाच वर्षांत हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त वाढवण्याचे नियोजन आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही प्रत्येक भारतीय घरासाठी स्मार्ट, सुरक्षित आणि सहज उपलब्ध उत्पादने उपलब्ध करून देत मेक इन इंडियाचा खरा अर्थ साजरा करत भारताच्या महत्त्वाकांक्षा आणखी बळकट करण्यासाठी उत्सुक आहोत.’

या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्यासाठी कंपनीने नुकतेच अडव्हांटिस जीएसएल डी १ हे आधुनिक भारतीय घरांसाठी तयार करण्यात आलेले डिजिटल लॉक लाँच केले आहे. १८,४९९ रुपये किंमत असलेल्या या लॉकमध्ये उपयुक्तता, आकर्षक डिझाइन आणि कनेक्टेड सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षा मिळवण्यासाठी ग्राहकांना दर्जा किंवा स्वरूप याबाबतीत तडजोड करावी लागणार नाही.

वेगवेगळी माध्यमे आणि प्रदेशांत विस्तार केल्यानंतर डिजिटल इनोव्हेशन आणि विकासावर आधारित धोरणासह लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्यूशन्स व्यवसाय आपला वारसा तसेच देशाच्या बदलत्या गरजांप्रती बांधिलकी जपत भारतात होम सेफ्टी क्षेत्रात नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading