मुंबई : भारतीय महिलांमध्ये चांगल्या दर्ज्याच्या परफ्युमची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. महिलांची ही वाढती मागणी लक्षात घेत गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या ‘पार्क एव्हेन्यू’ या प्रसिद्ध ब्रँण्डने आता महिलांसाठी परफ्युमची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘पार्क एव्हेन्यू’ या ब्रँण्डने ‘पार्क एव्हेन्यू फॉर हर’ हा नव्या परफ्युमची रेंज बाजारात आणलीआहे. या रेंजअंतर्गत पोईज, ग्रेस, व्हर्व्ह, अयलुर असे चार वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतील. या परफ्युममध्ये नुकताच तयार केलेल्या सुंगधीयुक्त फुलांचा, सौम्य मसाले तसेच उबदार लाकडी सुगंधांचा समतोल अनुभव घेता येतो. प्रत्येक परफ्युम विचारपूर्वक पद्धतीतून तयार करण्यात आला आहे. हा सुवास अंगावर दीर्घकाळ टिकून राहतो. महिलांना एक अनोखा व समृद्ध अनुभव मिळतो. आयएमएआरसीच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतातील परफ्युम बाजारपेठेत सुमारे १ हजार २५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बाजारपेठेत, महिलांचा सर्वाधिक वाटा असून, २०२५ मध्ये हा वाटा ५२ टक्क्यांपर्यंत उंचावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढती मागणी लक्षात घेत पार्क एव्हेन्यूने ‘फॉर हर’ ही नवी परफ्युम रेंज सुरु केली आहे. ही नवी रेंज ब्रँण्डच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा माला जात आहे. आतापर्यंत हा ब्रँण्ड केवळ पुरुषांचे सुवासिक आणि ग्रुमिंग उत्पादने बनवण्यासाठी ओळखला जायचा. आता मात्र या ब्रँण्डने आपल्या पारंपरिक ओळखीच्या पलीकडे जात भारतातील परफ्युम क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. यामुळे ब्रँण्डच्या व्यवसायाला नवी वेगळी दिशा मिळाली आहे. पार्क एव्हेन्यू ‘फॉर हर’ ही रेंज आधुनिक आणि आत्मविश्वासाने वावरणाया महिलांची जीवनशैली लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
Read More