प्रत्येक सकाळ ठेवा अधिक शक्तिशाली: कॅलिफोर्निया बदामांना तुमच्या नाश्त्यात स्थान का मिळायला हवे?
ग्राहकांमध्ये अधिक आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्यावर वाढता भर दिला जात असल्याने, साध्या आणि शाश्वत सवयी अंगीकारणे हे दीर्घकालीन आरोग्य आणि निरोगीपणाला पाठबळ देण्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसाची सुरुवात संतुलित नाश्त्याने केल्यास ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते आणि दिवसभर सजगपणे आहार निवडण्यासही प्रोत्साहन मिळते. मात्र, व्यस्त वेळापत्रक आणि धावपळीच्या सकाळीमुळे अनेकदा नाश्ता टाळला जातो किंवा संतुलित पोषण न देणाऱ्या सोयीस्कर पर्यायांची निवड केली जाते. पोषणतज्ज्ञांच्या मते, सकाळच्या छोट्या आणि व्यावहारिक सवयी अंगीकारल्यास संपूर्ण दिनचर्येत मोठे बदल न करता लोकांना सातत्याने अधिक चांगल्या पद्धतीने आहार घेण्यास मदत होऊ शकते.
तज्ज्ञांचे मत आहे की, नाश्ता अधिक पौष्टिक बनवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कॅलिफोर्निया बदामांसारख्या पोषकतत्त्वांनी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करणे. नैसर्गिकरित्या बहुउपयोगी आणि सहज उपलब्ध असलेले कॅलिफोर्निया बदाम प्रथिने, आरोग्यदायी चरबी, आहारातील तंतू (डाएटरी फायबर), मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई यांसह २४ पोषकतत्त्वांनी समृद्ध आहेत, त्यामुळे संतुलित नाश्त्यात त्यांचा सहज समावेश करता येतो. त्यामध्ये पॉलीफेनॉल्स देखील असतात, जे आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्या (गट मायक्रोबायोम) विविधतेला पाठबळ देण्यास मदत करतात. तसेच व्हिटॅमिन ई, झिंक, लोह आणि तांबे ही पोषकतत्त्वे रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्याशी संबंधित आहेत. प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी चरबी यांचे संतुलित मिश्रण जठर रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावण्यास आणि अधिक काळ तृप्तीची भावना टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून कॅलिफोर्निया बदामांचे सेवन केल्यास वजन व्यवस्थापनालाही मदत होऊ शकते.
सकाळच्या पहिल्याच आहाराद्वारे शरीराला योग्य पोषण देण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, मॅक्स हेल्थकेअर येथील रीजनल हेड – डायटेटिक्स ऋतिका समद्दार म्हणाल्या, “दिवसातील पहिला आहार हा पुढील अनेक तासांसाठी पोषणाचा भक्कम पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, व्यस्त सकाळीमुळे अनेकजण नाश्ता टाळतात किंवा केवळ सोयीच्या दृष्टीने अन्नाची निवड करतात. अधिक आरोग्यदायी सवयी अंगीकारणे हे अवघड असण्याची गरज नाही. संतुलित नाश्त्यामध्ये पौष्टिक आणि पोषकतत्त्वांनी समृद्ध अन्नाचा समावेश केल्यास एकूण आरोग्य आणि दिवसभर टिकून राहणाऱ्या ऊर्जा पातळीला पाठबळ मिळू शकते. कालांतराने अशा छोट्या आणि सजग निवडी अधिक आरोग्यदायी जीवनशैली घडविण्यात मोलाचे योगदान देऊ शकतात.”
आपले मत व्यक्त करताना, पोषण आणि वेलनेस सल्लागार शीला कृष्णस्वामी म्हणाल्या, “आरोग्यदायी आहार म्हणजे कठोर आहारनियमांचे पालन करणे किंवा जीवनशैलीत मोठे बदल करणे नव्हे. तो अशा सवयी विकसित करण्याबद्दल आहे, ज्या सातत्याने पाळणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य असते. संतुलित नाश्ता हा पोषकतत्त्वांनी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करण्याची उत्तम संधी असते, जे शरीराला आवश्यक पोषण देण्याबरोबरच एकूण आरोग्य आणि निरोगीपणालाही पाठबळ देता.”
व्यस्त जीवनशैली असूनही पोषणाला प्राधान्य कसे देते याबद्दल बोलताना, अभिनेत्री सोहा अली खान म्हणाल्या, “प्रत्येक सकाळ सारखी नसते, पण माझी दिनचर्या साधी ठेवली तर त्यात सातत्य राखणे खूप सोपे होते, हे मी शिकले आहे. मी माझ्या दिवसाची सुरुवात अशा पौष्टिक अन्नाने करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे मला उत्साही वाटते आणि दिवसातील पुढील प्रत्येक गोष्टीसाठी तयार असल्याची भावना मिळते. कॅलिफोर्निया बदाम माझ्या नाश्त्याचा नियमित भाग बनले आहेत, कारण ते सहज सोबत नेता येतात, खाण्यास सोयीस्कर आहेत आणि नैसर्गिकरित्या पोषकतत्त्वांनी समृद्ध आहेत. मी घरी असो किंवा प्रवासात, ते माझ्या दिनचर्येत सहजपणे बसणाऱ्या त्या साध्या सवयींपैकी एक आहेत. माझा ठाम विश्वास आहे की, दीर्घकालीन निरोगीपणा हा परिपूर्णतेचा ध्यास घेण्यापेक्षा आपण दररोज घेत असलेल्या छोट्या-छोट्या निर्णयांमधूनच घडत असतो.”
आरोग्य आणि सजग पोषणाविषयीची जागरूकता सातत्याने वाढत असताना, तज्ज्ञ ग्राहकांना वास्तववादी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सवयी अंगीकारण्यावर भर देण्याचा सल्ला देत आहेत. कॅलिफोर्निया बदामांसारख्या पोषकतत्त्वांनी समृद्ध अन्नाचा नाश्त्यात समावेश करणे ही अशीच एक सोपी सवय आहे, जी आधुनिक जीवनशैलीत सहजपणे अंगीकारता येते आणि एकूण आरोग्याला पाठबळ देते.
