किर्लोस्कर न्यूमॅटिककडून ‘तेझकॅटलिपोका ए ८००’ मॉडेल बाजारात उपलब्ध ; सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेशन क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात
पुणे – देशातील औद्योगिक एअर कॉम्प्रेसर क्षेत्रात किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी ही आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीने ‘तेझकॅटलिपोका ए ८००’ हे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. हे मॉडेल त्यांच्या सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसर श्रेणीतील महत्त्वाचे उत्पादन आहे. आज ३० जून रोजी कंपनीने पुणे येथे या नव्या मॉडेलची घोषणा केली. ‘तेझकॅटलिपोका ए८००’ हा मॉडेल ६०० ते ८०० सीएफएम क्षमतेचा देशातील पहिला संपूर्ण स्वदेशी बनावटीचा सेंट्रीफ्युगल एअर कॉम्प्रेसर आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे या मॉडेलचे डिझाइन आणि निर्मिती करण्यात आली आहे. या क्षमतेच्या सेगमेंटमध्ये अगोदर अशा पद्धतीची सेंट्रीफ्युगत कॉम्प्रेसन तंत्रज्ञानाची उत्पादने उपलब्ध नव्हती. ग्राहकांना आता हे नवीन मॉडेल पारंपरिक ड्राय स्क्रू कॉम्प्रेसरला कार्यक्षम तसेच विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देईल. त्यामुळे उद्योगांना कार्यक्षम, किफायतशीर आणि दीर्घकालीन लाभ देणारा पर्याय उपलब्ध झाला आहे. नव्या मॉडेलबद्दल किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमन किर्लोस्कर यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “आम्हांला ६०० सीएफएम ते ९८० क्षमतेतील किर्लोस्कर न्यूनॅटिकचा नवीन सेंट्रिफ्यूगल एअर कॉम्प्रेसर सादर
Read More