Sunday, October 11, 2026
Latest NewsPUNE

सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ संपन्न; विविध विद्याशाखांमधील शैक्षणिक उत्कृष्टतेचा गौरव

पुणे : सोमय्या विद्याविहार विद्यापीठाने (एसव्हीयू) आपला पाचवा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरातील गार्गी प्लाझा येथे आयोजित केला. विविध विद्याशाखांमधील पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा या समारंभात गौरव करण्यात आला. विद्यार्थी शैक्षणिक प्रवासातून व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाकडे वाटचाल करत असताना, त्यांच्यामध्ये व्यावसायिक उत्कृष्टता (पेशा), व्यापक विचार (सोच) आणि सशक्त चारित्र्य (चरित्र) जोपासण्याचा विद्यापीठाचा दृष्टिकोन या समारंभातून प्रतिबिंबित झाला.

या समारंभाला सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे कुलपती श्री. समीर सोमय्या, कुलगुरू प्रा. अजय कपूर, कुलसचिव प्रा. नंदकुमार गिलके यांच्यासह प्राध्यापक, पदवीधर विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत लष्करी व्यवहार विभागाचे माजी अतिरिक्त सचिव व्हाइस ॲडमिरल अतुल आनंद, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त) हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.

विद्यापीठाच्या बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेचे प्रतिबिंब म्हणून, मुख्य दीक्षांत समारंभानंतर नऊ शैक्षणिक गटांमध्ये विद्याशाखानिहाय पदवी वितरण समारंभ पार पडले. पदवीधर विद्यार्थी व्यवस्थापन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान; शिक्षण; धर्म अभ्यास; वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यास; मूलभूत आणि उपयोजित विज्ञान; मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे; संगीत आणि प्रयोगात्मक कला; तसेच क्रीडा अशा विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करत होते.

यावेळी बोलताना सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे कुलपती श्री. समीर सोमय्या म्हणाले, “विद्यापीठीय शिक्षणाने विद्यार्थ्यांना केवळ व्यावसायिक यशासाठीच नव्हे, तर स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, जबाबदारीने वागण्यासाठी आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यासाठीही सक्षम केले पाहिजे. आमचे पदवीधर आयुष्याच्या पुढील टप्प्यात पदार्पण करत असताना, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचा पाया असलेली उत्कृष्टता, जिज्ञासा आणि चारित्र्य ही मूल्ये ते पुढे नेतील, अशी आम्हाला आशा आहे.”

आपल्या पाचव्या दीक्षांत समारंभाद्वारे सोमय्या विद्याविहार विद्यापीठाने बहुविद्याशाखीय शिक्षण, बौद्धिक शोध आणि चारित्र्यनिष्ठ अध्ययनाप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ केली. त्याचबरोबर विविध व्यवसाय, समुदाय आणि राष्ट्रीय विकासाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये योगदान देण्यासाठी सज्ज असलेल्या पदवीधरांचा गौरवही केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading