लोकसेवा आयोगा’चे अध्यक्ष भिमनवार मुख्यमंत्री फडणवीस यांचेच् पाठीराखे ..?
भिमनवार यांचीच् नियुक्ती राजकीय असल्याने, फडणवीसांचा आंदोलन “राजकीय असल्याचा” दावा त्यांचेच अंगाशी …!
⁃ नैतिकता स्वीकारून फडणवीस व भिमनवार दोघांनी राजीनामे द्यावेत…. काँग्रेस’ची मागणी
१५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेध
⁃ पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे अध्यक्ष
विवेक भिमनवार हे IAS अधिकारी असून, वास्तविक प्रशासकीय अधिकारी यांनी कोणत्याही राजकीय पक्षांचे समर्थन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे करू नये वा राजकीय पक्षांसोबत संलग्नता ठेऊ नये हे नैतिक संकेत असून, IAS पदवी ग्रहण करतांना प्रशासकीय सेवेत कोणताही पक्षपात वा राजकीय भुमिका घेणार नसल्याची शपथ घ्यावी लागते.. मात्र IAS भिमनवार यांनी त्यांचे ट्वीट (X) अकाउंट वर २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र पोस्ट करून त्यांची स्तुती व समर्थन केलेले आहे.
त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास राजकीय आंदोलनाचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप त्यांचेच् अंगलट आला असून,
राजकीय हेतूने पुर्वग्रह दुषीत असलेल्या
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भिमनवार हेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक निघाल्याचा पुरावा पुढे आला असुन २०१४ च्या भिमनवार यांची पोस्ट पुढे आली आहे.
त्यामुळे संविधानीक नियमानुसार, नैतिकता स्वीकारून मुख्यमंत्री फडणवीस व लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भिमनवार या दोघांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली व १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा प्रदेश काँग्रेस तर्फ निषेध ही केला..!
